सर सर बरसली सर
मनाला फुटले अंकुर
झेप घेतली आकाशाकडे
उघडली दशदिशांची कवाडे
रुजली मुळे खोलवर
जशी अस्तित्वाची मोहर
बहर आला- सुगंध पसरला
आनंदाने आसमंत व्यापला
फुलाचे मग फळ झाले
भू कुशीत अलगद निजले
सर सर बरसली सर
मनाला फुटले अंकुर
मुक्ता पाठक शर्मा
Saturday, September 6, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment