हळूहळू
हळूहळू
हे सपाट्याने बदलतं जग, बघावं हळूहळू
सैरवैर हिंडताना, जगावं हळूहळू
काम करताना, सुख उपभोगावं हळूहळू
सुख लवकर झालं तरी, दु:ख व्हावं हळूहळू
दुसऱ्यांना प्रकाश देताना, जळावं हळूहळू
बडबड करतानाही, मौन पाळावं हळूहळू
सगळ्या सुंदर गोष्टीत, तुला पहावं हळूहळू
तू येण्याआधीच, तुझं येणं जाणवावं हळूहळू
तुझ्या घरासमोरून जाताना, चालावं हळूहळू
न बघितल्यासारखं करताना, तुला डोळ्यात भरावं हळूहळू
कुणाला माझं प्रेम कळलं नाही, तुला कळावं हळूहळू
तुला कळालं नाही तरी, तुला बघत मरावं हळूहळू
Reply
Sunday, September 7, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment