आठवणी तुझ्या... जणू पावसाच्या सरी,
धुंद होते त्या सरींमध्ये चिंब चिंब भिजुनी !
आठवणी तुझ्या... जणू इंद्रधनू सप्तरंगी,
प्रत्येक रंगात तुझ्या जाते मी रंगूनी !
आठवणी तुझ्या... जसा हा निसर्ग हिरवा,
हवाहवासा वाटतो तुझ्या प्रितीचा गारवा !
आठवणी तुझ्या... म्हणजे झुळझुळ वाहणारी नदी,
तुषार प्रितीचे तुझ्या झेलते मी अंगावरी !
आठवणी तुझ्या... म्हणजे काळे काळे ढग,
दाटून आले की... वाहू लागते अश्रूंची सर !!!!
*******************************************
आठवतात जेव्हा जेव्हा ते क्षण तुझ्या सहवासाचे ..
गालातल्या गालात एकटीच मी हसत राहते !
मनातल्या मनात काहीतरी गुणगुणत असते..
जणू तेच मोहक क्षण पुन्हा पुन्हा जगत असते !
आठवतात डोळे तुझे ... माझ्याकडे एकटक बघणारे,
एका क्षणातच माझ्यावर काहीतरी जादू करणारे !
आठवतात ओठ तुझे ... बंद असूनही खूप काही सांगणारे,
नकळत कधीतरी सूरांचे तराणे छेडणारे !
आठवतो स्पर्श तुझा हळूवार, अगदी आपुलकीचा..
मखमली अंगावर जसा पदर रेशमाचा !
वाटते, तू असावा.. नेहमी असाच माझ्या समीप,
Friday, September 5, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment