Friday, September 5, 2008

मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढे

मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढेस्वप्नांच क्षितीज सोडून चाललो मी वादळाकडेवाटल तुझी सोबत असेल तर जिकेन जग सारंआज तुच पाठ फीरवलीस आता पाहू मी कोणाकडे.पसरल्या काळोखात मी उभा अर्धा चद्रांकडेता-याचं जग सोडून चाललो विझणा-या दिव्याकडेतु तर विझवुन गेलीस ज्योत माझ्या घरातलीआता उडेड मागु तर मागु कसा या प्रकाशाकडे.ओघळ्त्या आसवात मी उभा ओल्या किना-यापुढेउधाणलेल्या लाटाही हसतात पाहुन तुझ्या वेडयाकडेआठवतय आपल्याला पाण्यात भिजण्याच वेड होतंआज अश्रुंनीच भिजुन परतलोय मी पुन्हां घराकडे.तु म्हणतेस मागुन बघ मिळेल तुला प्रेम कोणाकडेकोण येइल घरात माझ्या काय आहे आता या शुन्याकडेइथेच शब्दांनाही थाबंवतोय मी आता काय करु कारणतुझ्या आठवणी पुन्हां आल्या आहेत माझ्या पापण्यांकडे.

No comments: