Sunday, September 7, 2008

अशी एक संध्याकाळ असावी

अशी एक संध्याकाळ असावी
अशी एक संध्याकाळ असावी
सोबत फ़क्त तुच असावी
मावळत्या सुर्याने दिलेली सोनेरी किनार
त्या येणा-या रातीला असावी
अशी एक संध्याकाळ असावी
न सोडवता येणारी एक मिठी असावी
वर्तमानाच भान ठेऊन
भविष्याची स्वप्ने संगे असावी
अशी एक संध्याकाळ असावी
हातात तुझा हात घेताच जगाची भुल पडावी
दुराव्याने डोळे ओलावलेच जरी
त्याला सुखाची मात्र नक्की साथ असावी
अशी एक संध्याकळ असावी
प्रत्येकाला हवीहवीशी वाटावी
सहजा सहजी मिळत नसली तरी
प्रत्येकाच्या नशीबात असावी
खरच अशी एकतरी संध्याकाळ असावी
जिच्यासाठी सारी दुनियाही गहाण पडावी

No comments: