चल दोघे मिळून
पावसात बागडू..
गार वारा , अंगावर शहारा
वेचून गारा
पावसांत खाऊ..
जलाचे तळे , फुलांचे मळे
निळाई कोसळे
बघत नाचू..
मोराची साद , चातकाची हाक
वीजांचा धाक
ऐकत राहू..
चिंब पक्षी , थेंबांची नक्षी
धुसर चांदणी
मोजत जाऊ..
सुगंधी माती , ओली तॄणपाती
हरित आठवणी
उरी ठेऊ..
नेत्री साचलेले , उरी दाटलेले
ओठ मिटलेले
थोडे उघडू..
नभी दामिनी , उरी ठिणगी
हवीशी मिठी
आता आवरु..
पुरे हे भिजणे..पुरे हे नाचणे..
ओंजळभर पाऊस मनी साठवू
अन येत्या ग्रीष्माला सामोरे जाऊ..
Sunday, September 7, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment