सहज बोलताना
सहज बोलताना
तुझी बात आली
जुन्या सावल्यांची
जुनी रात आली
हसलो जरी मी
अश्रू फसवून गेले
तुझ्या आठवांची
बरसात झाली...
म्हटले कुणी,
"ती मौजेत आहे",
चला एकदाची
खबरबात आली...
खरे सांग माझे
कसे पाप झाले
का माझ्या स्मृतींना
अशी मौत आली?
लक्ष्मीचीच होती
तुझी पाऊले जी
कुणा पुण्यवंताच्या
दारात गेली...
Friday, September 5, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment