Friday, September 5, 2008

माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नका

माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकामी तर मुखवट्यांचा राजा आहेकधी ऐकायला मधूर होतो, पणआज कर्कश वाजणारा बाजा आहेमाझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकाअंतरी दु:खांचा लावा आहेपेट घेतला नाही आजवरशेजारीच अश्रूंचा ओलावा आहेमाझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकामी तर वेदेनेची खाण आहेतुलना नाहिच भीष्म पिताम्याशीमी तर त्यांच्याहून महाण आहेमाझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकाझेलले मी कितीतरी घाव आहेगळा चिरला ज्यांनी त्यांना मित्र म्हणालोअलिप्त माझा असा स्वभाव आहेमाझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकामाझं झिजणंही भकास आहेकधी प्राणवायू होतो ज्यांचाआज त्यांचाच कोंडलेला श्वास आहे

No comments: