खर सांगतॊ तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तु असतेस कधी कधीच, ती मात्र कायमची उरी
खर सांगतॊ तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तू भेटणार अधुन मधुन, ती मात्र आहे मनात रुजून
तुझी नेहमीच निघायची घाई, तिला जाणं माहितच नाही
तू असशील जरूर रेखा, पण ती जया भादूरी
खर सांगतॊ तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तू फ़ेसाळत्या लाटेसारखी, ती किनारा असते
तू निघून गेल्यावर तीच एक सहारा असते
तिच होते सखी माझी, जेव्हा दाटून येतात सरी
खर सांगतॊ तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तू नसतेस तेव्हा तिचच असत राज्य मनावर
तू भान हरपून टाकतेस ती आणते भानावर
ती शितल चंदन, तू चांदन्याची सुरी
खर सांगतॊ तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तू असशील गुलाब, ती मोहक रातराणी
तू हॄदयाचे आलाप, ती श्वासामधली गाणी
तू कान्ह्याची राधा, ती स्वरमंजुळ बासरी
खर सांगतॊ तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी....
Sunday, September 7, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment