Friday, September 5, 2008

बघ माझी आठवण येते का......

बघ माझी आठवण येते का......
सये....
आता तुझा प्रत्येक क्षण माझ्या अस्तित्वापासुन दुर असेल..
वर वर तु निच्छित असशील... मनात मात्र दुःखांचा पुर असेल !
काही दिवसांनंतर हा पुर ओसरेल...
कुठल्यातरी बेसावध क्षणी... पुन्हा पाऊल घसरेल..
पुन्हा कोणीतरी आवडू लागेल... पुन्हा डोळे झुरतील..
मनात मात्र तुझ्या तेव्हा...माझेच उसासे असतील..
वाट बघ... प्रेमाची भावना उफ़ाळून येते का..?
त्या क्षणी नकळत का होईना ... बघ माझी आठवण येते का?
किंवा कदाचित असंही होईल... तुला एखाद स्थळ सांगुन येईल..
दोन्ही घरची बोलनी होतिल... दोन्हीकडून होकार असेल..
घरात जरी 'हो' म्हटलस तरी... मनात तुझ्या 'नकार' असेल..
पुन्हा मन दुबळ होईल... स्वतःची बाजू मांडायला..
अपयशी ठरलं म्हणुन वेडं...तुझ्याशीच लागेल भांडायला..
भांडण मिटेपर्यंत कदाचित... अंगावरती हळद चढेल..
आपण नक्की काय करतोय? तुझ्या मनाला कोडं पडेल..
सनईच्या सुरावर, वाजत्रांच्या तालावर.. नव्या घरात प्रवेश होईल..
क्लेश होऊ देऊ नकोस..असेल त्याचा स्विकार कर..
तुझ्यावर आता जवाबदारी आहे.. याचाही तेव्हा विचार कर..
अंगावरची हळद आता बघ हळूह्ळू उतरते का?
पिवळ्या पाण्याकडे लक्ष गेल तर बघ.. माझी आठवण येते का?
दिवसामागून दिवस सरतील.. वर्षामागून वर्षे जातील..
नव्या आयुष्यामध्ये पुन्हा... नवी नाती निर्माण होतील..
नव्या नात्यांच्या नव्यापणात... आपले नाते जुणं होईल..
नात्याप्रमाणेच हळूहळू... मनसुद्धा सुनं होईल..
माझ्या सुन्या मनात मात्र... फ़क्त तुच उरशील..
माझ्यासारखीच.. एकदिवस तू सुद्धा झुरशील..
बघ.. एखादी पाऊलवाट तुला..माझ्या आठवणींकडे नेते काय?
बघ.. सुकल्या झाडाला पुन्हा.. नव्याने पालवी फ़ुटते काय?
आयुष्यात आतापर्यंत निदान... निखळ 'मैत्री' तरी उरते काय?
आणि आयुष्यात... एकदातरी .. बघ माझी आठवण येते का.....?

No comments: