पेनाच्या टोकाशी एकदा
दु:ख निमूटपणे येऊन बसले
शाईच्या काळ्या रंगात
स्वत:ला पार विसरून गेले.
पेनाच्या टोकाने एकदा
एक दु:ख जन्माला घातले
गोंजारले, कुरवाळले, जपले
आता ते झाले अगदी आतले.
पेनाच्या टोकाला एकदा
दु:ख सहन झाले नाही
नुसतीच झरली शाई
गीत उमटले नाही.
पेनाच्या टोकाशी पुन्हा
दु:ख येऊन बसतेच
प्रत्येकच एकट्याची
अशी एक जागा असतेच...!
Saturday, September 6, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment