Sunday, September 7, 2008

मला आयुष्याकडून काहीच नकोय

मला आयुष्याकडून काहीच नकोय
माझी आणि आयुष्याची एकदा स्पर्धा लागली
जिंकलो तर हवं ते मिळेल अशी पैज ठरली
पण मी हरलो
म्हणून मला आयुष्याकडून काहीच नकोय
सर्वांनी आयुष्यात खूप काही दिलं
पण नशीबाने सर्व काही नेलं
आयुष्य आणि नशीब यांचा जीवघेणा खेळ आता मला कळला
म्हणून मला आयुष्याकडून काहीच नकोय
ज्यांचा कधी विचारच केला नव्हता त्यांनी हात दिला
आणि ज्यांच्याकडून अपेक्षा केली त्यांनी अपेक्षाभंग केला
झाल इथे परत नशीबच आडव आल
म्हणून मला आयुष्याकडून काहीच नकोय
जिच्यावर मनापासून प्रेम केल
तिने कधी समजूनच नाही घेतल
आता आयुष्यात बाकी काय उरल
म्हणून मला आयुष्याकडून काहीच नकोय
तरीही ते म्हणालं 'ही घे अजून एक संधी'
पण नशीब सोबत नाही याची मला पूर्ण खात्री
म्हणून मला आयुष्याकडून काहीच नकोय
खरचं काहीच नकोय

No comments: