Sunday, September 7, 2008

ते प्रेत होते त्याचे ज्याने

ते प्रेत होते त्याचे ज्याने
काय सांगु कसे सांगु
इथे कुंपणाने शेत खाल्लय
काय सांगु कसे सांगु
या खांद्यावरुन ते प्रेत नेलय
ते प्रेत होते त्याचे ज्याने
तिच्यावर जीवापाड प्रेम केले
ते प्रेत होते त्याचे ज्याने
जीव देउन ते सिध्द केले
ते प्रेत होतं त्याचे ज्याने
ह्रदयात तिला दिली जागा
ते प्रेत होते त्याचं
ज्याला शेवटी हि तीने दिला दगा.
ते प्रेत होतं त्याचं
जो फक्त तीच्यासाठि जगत होता
ते प्रेत होत त्याच जो म्हणत होता
कि हा जीव पण तीचाच होता.

ते प्रेत होते त्याचे ज्याने

ते प्रेत होते त्याचे ज्याने
काय सांगु कसे सांगु
इथे कुंपणाने शेत खाल्लय
काय सांगु कसे सांगु
या खांद्यावरुन ते प्रेत नेलय
ते प्रेत होते त्याचे ज्याने
तिच्यावर जीवापाड प्रेम केले
ते प्रेत होते त्याचे ज्याने
जीव देउन ते सिध्द केले
ते प्रेत होतं त्याचे ज्याने
ह्रदयात तिला दिली जागा
ते प्रेत होते त्याचं
ज्याला शेवटी हि तीने दिला दगा.
ते प्रेत होतं त्याचं
जो फक्त तीच्यासाठि जगत होता
ते प्रेत होत त्याच जो म्हणत होता
कि हा जीव पण तीचाच होता.

डोळे तुझे..

डोळे तुझे..
डोळे तुझे..

माझ्या खिडकीतल्या आभाळातून
कधी मलाच न्याहाळत असतात
डोळे तुझे..
मला क्षणभरच येत हसायला जरासं
आणि क्षणातच हरवतात पुन्हा
डोळे तुझे..
कधी मेघांआडून, कधी मिचकावून
मला पाहत असतात
डोळे तुझे..
तू असतेस अगदी खऱ्यातलीच
मला अस्तित्व तुझं पटवून देतात
डोळे तुझे..
मी लिहीत असतो कविता तुझ्यावर
आणि उत्सुकतेने बघत असतात
डोळे तुझे..
कधी चुकून मी करीत असतो
चुक एखादी
आणि मला सावरत असतात
डोळे तुझे..
कधी हूरहूर मलाही
स्पर्शाची तुझ्या
आणि मला स्पर्शत असतात
डोळे तुझे..
तुझे डोळे आभाळात, कि आभाळ तुझ्या डोळ्यात..?
नक्की फरक यातला सांगतात मला
डोळे तुझे..
तू असलीस जरी दूर तिथे
तरी माझ्यासोबत असतात नेहमीच
डोळे तुझे..

एकदा तरी.... प्रेम करावं.......

एकदा तरी.... प्रेम करावं.......
एकदा तरी.... प्रेम करावं.......
प्रेम कुणावर तरी एकावर करावं,
स्वतच्या नकळत झोकून द्यावं,
माणसांच्या गलबल्यात नजरेनी बोलावं,
नि प्राणप्रिय एकांतात स्पर्शानी स्पर्शावं,
तीच्याशिवाय दूसरं काहि सुचूच नये इतकं बेभान व्हावं,
तीच्या नुसत्या चाहुलीने देहभान हरपावं,
ती समोर नसताना शब्दानी मुक्त बोलावं,
समोर आली की मात्र निशब्द व्हावं,
वाट बघावी आपणच मानलेल्या संकेत स्थळि,
याव तिनं,
जावं पूढे तसंच निघून एकदाही न बघता मागे वळुन,
आपण इथं तिष्ट्त असल्याची तिच्या मनाने नोंद तरी घ्यावी,
उद्या इथे परत याच वळणावर तिची पाउले थोडीतरी अडावी?
तिच्या आठ्वणीने सूरु होणारा दिवस, तिच्या आठ्वणीतच सम्पावा,
साऱ्या जगापासून एक तुटलेपण यावं,
तिच्या स्वप्नांच्या खरेपणात गुंतून जावं,
अनुभवावी प्रचंड मानसिक शांति नि अफाट अस्वस्थता,
अजमावं एकमेकाना नि उगीचचं दूखवावं,
त्या निमित्तानी तरी भेटिला यावं,
एकदातरी द्यावा अनूभव असा बेहोशीचा,
बरोबरीने प्रवास व्हावा ,दोनच पावलांचा ,
चुकीचा तर चुकीचा !!!!!!!!!

बोलताना जरा सांभाळून....

बोलताना जरा सांभाळून....
शब्दाला तलवारीपेक्षा धार असते
फ़रक फ़क्त एवढाच की,
तलवारीने मान तर
शब्दांनी मन कापले जाते
जरी तलवारीच्या जखमेतून रक्त
आणि शब्दांच्या जखमेतून अश्रू
येत असले तरी,
दोघांपासून होणारी वेदना मात्र सारखी असते.
म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून.........
शब्दच मानसाला जोडतात
शाब्दच मानसाला तोडतात
शब्दच रामायण आणि महाभारत घडवतात........
तुझ्या एका शब्दावर
माझे सर्वस्व अवलंबून आहे
तुझ्या एका शब्दावर माझे हसने
आणि एका शब्दावर रडणे आहे
म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून.........
शब्दाला तलवारीपेक्षा धार असते

आयुष्याच्या अल्बममध्ये

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात
गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.
आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.
भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.
गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.
कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.
सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.
द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.
रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा!

तुम्ही पण कमाल करता यार!

तुम्ही पण कमाल करता यार!
प्रेमाच्या गोष्टी करता यार?
प्रेम on-line खुलते आजकाल
ह्रिदयामधे जपता यार?
scrap,sms हे प्रेमाचे बोल
डोळ्यांची भाशा बोलता यार?
प्रत्येक Forum वर एक मैत्रीण.
एकाच अबोली साठी झुरता यार
messages आणि chat सोडून
बाहेर भटकायच म्हणता यार?
Blogs वाचायचे मिळतिल ते
तुम्ही पुस्तके वचता यार?
Community मधे रमायचे आता
चौकात गप्पा मरता यार?
धावयचे सोडून जगासोबत
स्वप्नां मधे रमता यार?
ह्रिदयात जागा मागता यार?
अरे!कोणत्या जगात जगता यार?

बोलण्याने बोलणे वाढेल आता

बोलण्याने बोलणे वाढेल आता
बोलण्याने बोलणे वाढेल आता
बोललो नाही तरी चालेल आता
देव सत्संगांमध्ये बंदिस्त झाला
तो कसा दीनाघरी धावेल आता
हातघा‌ईने पुन्हा भांडून घे‌ऊ
काय चर्चेन साधेल आता
या नदीला पार केले पापण्यांनी
वेदनेचा घाटही लागेल आता
पोरके याहून भीषण दुःख नाही
कोण मज समजेल, समजावेल आता

हळूहळू

हळूहळू
हळूहळू
हे सपाट्याने बदलतं जग, बघावं हळूहळू
सैरवैर हिंडताना, जगावं हळूहळू
काम करताना, सुख उपभोगावं हळूहळू
सुख लवकर झालं तरी, दु:ख व्हावं हळूहळू
दुसऱ्यांना प्रकाश देताना, जळावं हळूहळू
बडबड करतानाही, मौन पाळावं हळूहळू
सगळ्या सुंदर गोष्टीत, तुला पहावं हळूहळू
तू येण्याआधीच, तुझं येणं जाणवावं हळूहळू
तुझ्या घरासमोरून जाताना, चालावं हळूहळू
न बघितल्यासारखं करताना, तुला डोळ्यात भरावं हळूहळू
कुणाला माझं प्रेम कळलं नाही, तुला कळावं हळूहळू
तुला कळालं नाही तरी, तुला बघत मरावं हळूहळू
Reply

पुन्याच्या पोरी

पुन्याच्या पोरी
पुन्याच्या पोरी रे पुन्याच्या पोरी
बुक्क्यान्चा मार पन बोलायची चोरी
दिसायला असेल पडलेला प्रकाश जरी
मगावं स्ट्राबेरी तर मिळते मारी
कुनी असेल स्मार्ट तर कुनी असेल गोरी
जवल जाउन बघा यांची पाटिच कोरी
झाल्या किती मोठ्य़ा तरी एकतील लोरी
पेन्टहाउस ला जशी एक अट्याच मोरी
थोड्या आहेत बाभाळी अन थोड्याश्या बोरी
कुठलीही पोरगी तशी आहे फ़ाशीचिच दोरी
पुन्याचा पोरिंचा असतो हजारदा रीटेक
ब्याटींग करता करता उडालेली असते विकेट
TVS ची SCOOTY आनी BAJAJ ची SUNNY
श्याम्पू लावला तरी सुटत नाही फ़नी
बाहेर जाताना यान्चे तोंड असते झाकलेले
असावेत यान्ना स्वताचे वीकपॊईन्ट समजलेले
पोरिंना वाटते आम्हि पावसाच्या गारा
अग उडालेला फ़्युज तुमचा तुम्हि तुट्लेल्या तारा
सान्गायला सरळ असतात या पोरि वागायला पाजी
खानार्र्याने जपुन खावी हि कार्ल्याची भाजी
म्हनुन पुन्याच्या पोरी रे पुन्याच्या पोरी
बुक्क्यान्चा मार पन बोलायची चोरी

कँटीन मधला चहा आणि

कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !
कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !
बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !
परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !
पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.
अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!
पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

प्रवासात सगळेच अनोळखी असतात

प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो
कारण त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो
जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो
एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जालायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो
जगण्याचे संदर्भ असे क्शणाक्शणाला बदलतात
आणी म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलतात

मला आयुष्याकडून काहीच नकोय

मला आयुष्याकडून काहीच नकोय
माझी आणि आयुष्याची एकदा स्पर्धा लागली
जिंकलो तर हवं ते मिळेल अशी पैज ठरली
पण मी हरलो
म्हणून मला आयुष्याकडून काहीच नकोय
सर्वांनी आयुष्यात खूप काही दिलं
पण नशीबाने सर्व काही नेलं
आयुष्य आणि नशीब यांचा जीवघेणा खेळ आता मला कळला
म्हणून मला आयुष्याकडून काहीच नकोय
ज्यांचा कधी विचारच केला नव्हता त्यांनी हात दिला
आणि ज्यांच्याकडून अपेक्षा केली त्यांनी अपेक्षाभंग केला
झाल इथे परत नशीबच आडव आल
म्हणून मला आयुष्याकडून काहीच नकोय
जिच्यावर मनापासून प्रेम केल
तिने कधी समजूनच नाही घेतल
आता आयुष्यात बाकी काय उरल
म्हणून मला आयुष्याकडून काहीच नकोय
तरीही ते म्हणालं 'ही घे अजून एक संधी'
पण नशीब सोबत नाही याची मला पूर्ण खात्री
म्हणून मला आयुष्याकडून काहीच नकोय
खरचं काहीच नकोय

तु पुन्हा येशील का?.............

तु पुन्हा येशील का?.............
बेरंग या जीवनात माझ्या
रंग पुन्हा तू भरशील का ?
सुन्या सुन्या या आयुष्यात माझ्या
साथ द्यायला पुन्हा तू येशील का ?
रीक्त झालेल्या या ओंजळीत माझ्या
पुन्हा फुले तू ठेवशील का ?
कोमेजल्या पाकळ्या जेंव्हा
रुतलेले काटे तू काढशील का ?
नेहमी प्रमाणे उशीरा का होई ना
भेटीला परत माझ्या तू येशील का ?
तुझ्या सहवासतील त्या क्षणांचा
पुन्हा अनुभव तू देशील का ?
सांजवेळी वाहतो जेंव्हा शांत वारा
आठवण माझी तूला येते का ?
ज़ीवनाच्या वाटेवर मला एकटा सोडला
याची खंत तूला वाटते का ?
दूर माझ्या पासून जताना
तुझ्या ही डोळ्यात अश्रू दाटले होते का ?
तूझी आठवण ये उन साठलेल्या अश्रूंना
वाट देण्यासाठी तरी परत येशील का ?
जेंव्हा जेंव्हा आठवण तूला माझी येईल
हाक पुन्हा तू मारशील का ?
बेसूर झालेल्या ह्या जीवनगाण्याला
सूर पुन्हा तू जोडशील का ?
पडलेल्या या प्रष्णांना माझ्या
उत्तर तू कधी देशील का ?
सुन्या सुन्या या आयुष्यात माझ्या
साथ द्यायला पुन्हा तू येशील का ?......
साथ द्यायला पुन्हा तू येशील का ?......

खर सांगतॊ तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी

खर सांगतॊ तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तु असतेस कधी कधीच, ती मात्र कायमची उरी
खर सांगतॊ तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तू भेटणार अधुन मधुन, ती मात्र आहे मनात रुजून
तुझी नेहमीच निघायची घाई, तिला जाणं माहितच नाही
तू असशील जरूर रेखा, पण ती जया भादूरी
खर सांगतॊ तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तू फ़ेसाळत्या लाटेसारखी, ती किनारा असते
तू निघून गेल्यावर तीच एक सहारा असते
तिच होते सखी माझी, जेव्हा दाटून येतात सरी
खर सांगतॊ तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तू नसतेस तेव्हा तिचच असत राज्य मनावर
तू भान हरपून टाकतेस ती आणते भानावर
ती शितल चंदन, तू चांदन्याची सुरी
खर सांगतॊ तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तू असशील गुलाब, ती मोहक रातराणी
तू हॄदयाचे आलाप, ती श्वासामधली गाणी
तू कान्ह्याची राधा, ती स्वरमंजुळ बासरी
खर सांगतॊ तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी....

आज तुझ्याशिवाय

आज तुझ्याशिवाय
आज तुझ्याशिवाय काही लिहायचे ठरवले होते..
पाहता पाहता तुझ्या प्रत्येक क्षणांनी मला हरवले होते..
आज या क्षणाला..तुझे प्रत्येक क्षण मला डिवचत होते..
प्रेम करायचे नव्हते तर.. इतके क्षण दिले का होते...?
असेच जर वागायचे होते तर.. माझे प्रत्येक क्षन तुला हवे का होते?
असेच जर वागायचे होते तर. प्रेमाचे क्षण दाखविले का होते..?
असेच जर तोडायचे होते तर.. क्षण जोडले का होते..?
मनात नसुन सुद्धा तुझ्या अस्तित्वाने मला हरविले होते..
आता कितीही रागवायचे म्हटले.. तरी तुझ्यावरच्या प्रेमाने गुंतविले होते..
यात तुझा दोष नाही !!.. कारण , तुझ्या अस्तित्वाचे सर्वच क्षण मला प्रिय होते..

देशील का परत हात....

देशील का परत हात....
मित्रा,मैत्रीत,तुझा हात का नाही?
येणारे क्षण सारे हसणारे नाही।
मी कुठे होतो दुकटा? मी कुठे होतो फ़ुकटा?
मी मोजली होती नाणी ती तुझ्यापेक्ष। कमीच होती
सोसले होते जरी दुःख संयमाने तुझ्याजाण्याचे
एकदा माझ्या डोळ्यातं अश्रु दिसले होते
मैत्रीची सारी पाने आपली कुठे कोरीच होती?
त्यापैकी एखाद्या पानावर आपल्या मैत्रीची कहाणी होती
कुठे गेलास तु? मैत्री तुझी का आटली, आता?
कुठे गेलास तु? डोळे तुझे का भरले, आता?
तुझ्या तो मैत्रीचा श्वास पुरे होता जगण्यास माझ्या
देशील का परत हात तुझा मैत्रीस माझ्या?

आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला.................

आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला.................
आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला.................

आनंदचा तो सुर्य जणू आज लवकरच मावळला
माझ्या या अवस्थेवर लाखो चांदण्यासोबतचा
पोर्णिमेचा तो चंद्र चिडवत हसला
आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला.................

आज तुझ्याबरोबर चालताना
तुझी साथ अनोळखी वाटु लागलीये या मनाला
आता तु माझी नसतानाही तुझं
अजुनही माझ्या स्वप्नात येणं अजब वाटतय मला
तुझी आत्ताची ती भेदक नजर घरं पाडी काळजाला
आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला.................

आज पुन्हा वेदनांच वादळ सुटलयं
सोबत भावनेचा धुराळाही उडाला
पुन्हा या मनाच ते स्वप्न कुठतरी भटकलयं
समजाऊन दमलोय या वेड्या मनाला
आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला.................

पुन्हा सतावती मला तुझ्या आठवनी
पुन्हा त्या न संपणा-या रात्री
बघ आलय आता या डोळ्यात पाणी
आज पुन्हा तो वेदनेचा पाऊस बरसला
आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला....

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नको

ओळखलत का सर मला!!

ओळखलत का सर मला!! aathavate ka kavita????
ओळखलत का सर मला पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी
क्षणभर बसला नन्तर् हसला बोलला वरती पाहुन,
गन्गामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुन
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिन्तीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिन्त खचली चुल विझली होते नव्ह्ते नेले,
प्रसाद म्हणुन पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेवुन सन्गे सर,आता लढतो आहे,
पडकी भिन्त बान्धतो आहे.चिखलगाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
'पैसा नको सर,जर एकटेपणा वाटला
मोडुन पडला सन्सार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवुन नुसते लढ म्हणा.....

जाते म्हणतेस हरकत नाही,

जाते म्हणतेस हरकत नाही,
जाते म्हणतेस हरकत नाही,
काढत आश्रू पाहून जा.
नाते तोडतेस हरकत नाही,
वीज़ता श्वास पाहून जा.
जाणून सारे संपवताना
हीच एवढी वि न ती
हस्ते आहे हरकत नाही,
बुडती नाव पाहून जा.
जालते आहेस हरकत नाही,
जाळणारे गाव पाहून जा........

मी "थांब" म्हणालो त्याला.......................

मी "थांब" म्हणालो त्याला
आवाज माझा ऐकताच
तो जागच्या जागीच थांबला


क्षणभर माझं भानंच हरपलं
पाहुन त्याच्या चालण्याला
सुख-दुख:, नाती गोती सगळ्यांच्या
ओझ्याने तो पार थकलेला
तेव्हा पाहुन त्याच्या थकव्याला
आवाज मी त्याला दिलेला...........


पण..... नंतर
विचार मनात आला
थांबुनतरी मिटेल का सगळा थकवा त्याचा ?
चालत राहणं हा धर्म आहे "जीवनाचा"
म्हणुन मग थांबवण्यापेक्षा
चालण्यास थोडा उत्साह देऊया त्याला

पण....... हे आधी उमगलंच नव्हत मला
म्हणून
मी "थांब" म्हणालेलो त्याला
आवाज माझा ऐकुन
तो जागीच थांबलेला..............

खोट खोट विसरशीलही मला तु

खोट खोट विसरशीलही मला तु
खोट खोट विसरशीलही मला तु
पण जे दिवस आपले होते ते कसे वजा करशील आयुष्यातुन
नाही ग वेडे आपले हे प्रेम विसरण्यासाठी नव्हते तर ते दिर्घायुषी व अमर होते
चिवचिवणारया चिमण्या, किलबिलणारे पक्षी
मोकळ्या आकाशातील चंद्र चमचमणारा प्रकाश
रातराणीचा सुगंध दिवस रातीचा अतुट बंध
रिमझिमणारा पाऊस फ़ुलांची फ़ुलण्यातली हौस
माझे प्रेम विसरू शकशील का?
मरशीलही कदाचित माझ्याशिवाय बोलली होतीस एकदा तु
मला माहीत आहे विसरण्याचा निष्फळ प्रयत्न करशील तु
आठवु लागलो कि कासाविस होशील तु
भुतकाळात डोकावुन शोधशील तु
नाहीच सापडलो तर विरघळशील तु
विरघळून मिठीत येण्यासाठी तडफडशील् तु
पण तुझी ति तडफड नाही ग पाहु शकणार मी
कारण रोज तोच अनुभव घेतोय मी
तु मला विसरुच शकणार नाहीस मग अशी दुर का?
चातकाचा शोध केंव्हातरी संपेल कोलंबसचा प्रवास केंव्हाचा संपलाय
चुकलोही असेन अनाहुतपणे मुर्खासारखा वागलोही असेन
पण त्याची एवढी मोठी शिक्षा का देतेस मला आणी स्वतःलाही
शेजारचा गुलमोहोर फुलण्याआधी
डोळ्यांतील् अश्रु सुकण्याआधी
शरिरातुन प्राण जाण्याआधी
तु परत येशील का?
पुन्हा परतुन लांबवर येऊ नकोस
फक्त एकदा मागे बघ
मी उभा आहे .

तुझा शिवाय जगन आता

तुझा शिवाय जगन आता
तुझा शिवाय जगन आता ,अगदी कळणार आहे,
आयुशाच्या वेडे वळण आशेकडेच व ळनार आहे,
तुझ आंगण , तुझ घर , भांडी देखील तुझीच ग,
तुझा कपाट , तुझा आरसा , उशी देखील तुझीच ग,
उशीवर आश्रू नाही हसत मावळणार आहे.
घर असते दोघांचे उगाच समजायचो मी,
सावलीत नाही पण उन्हात झुरायचो तुझसाठी,
सावलीत तू उभी राहा,उन्हात मी राहतो,
आज घर शांत आहे, आज मी ही शांत आहे,
दरावरच्या पडद्याना आशा उगीच जिवंत आहे,
आढवनीचा पडदा सारून, दार बंद करणार आहे,
कुणाच्या दुखंची कुणाला आता सल नाही,
कुणाच्या दुखाणी आता कुणाची तडफड होत नाही,
कुणा साठी कुणाचे डोळे झरत नाही,
कुणा साठी कुणाचे आंत:करण जळत नाही,
कुठे आहे असे पाय जिथे टेकवावे डोके.......
खर तर तुझाच पायावर डोक ठेऊन
प्रेम भरल्या स्वप्नात जायचे आहे.....
पण
इथे रेषमाला गिराहिक सारे पण खर्या काप साला कुठे भाव ???

आठवण

आठवण
तु खुप देवुन गेली होतीस आठवणीच्या बरोबर
आज मलाच वाटत आपलच चुकल होत बरोबर
नात होत सन्पल तरी अजुनही ते टिकुन आहे
तुझ्या त्या आठवणीने ते अजुन ही भरून आहे
तुझ्या आठवणीची दुनिया ही वेगळीच होती
प्रत्येक विरहाच्या वाटेवरती मिच सदा अनोळखा आहे
सायन्काळी दिवस मावळताना तुझ्या आठवणी मनात दाटतात
दिवस उजडू लागताच त्याही मला सोडून दूर जातात

चेहरयवार माझ्या हास्य आहे...........

चेहरयवार माझ्या हास्य आहे...........
चेहरयवार माझ्या हास्य आहे...........
निस्तब्ध ज़हाले डोळे,
चेहर्यावर मात्र हस्या होते,
मरता मरता मला
जगण्याचे गुपित कळले होते.......
अश्रू ढाल नारे कोणी नव्हते,
चार खांदे ही माजवर रूसले होते,
कोपर्‍यात बेवारस पडताना,
जगाचे रहस्या कळले होते........
सुखा मागत होतो पण देवाने ते एकले नाही,
मरण मागताच हातचे काही राखले नाही,
अखेरच्या क्षणात शरीराच दान करून गेलो,
जन्मभर दान मागून,शेवटी दान करून गेलो
आत्मा साथ देत आहे,शरीर सोडून गेले,
जाता जाता मला बरच काही शिकवून गेल,
जीवनात दान करण्याचा आन्नद काही वेगळा आहे,
म्हणून मेलो जरी असलो तरी,,,चेहरयवार माझ्या हास्य आहे...........

ति माझी

ति माझी
खरच ति आपणाला जिवनात हवी अशी वाटते.
थोडे दिवस का होईना तिची अपणाला गरज भासते.
हातात तिला घेवून चालताना खूप बरे वाटते.
सोबत ति असताना मन किती प्रसन्न वाटते.
घेवून जतो आपण जेन्व्हा हे फिरायला.
बरे वाटते सोबत तिच्या आपणाला भिजायला.
पाण्याचा प्रत्येक थेन्ब अन्गावर रोन्मास उभा करतो.
अशाच वातावरनात आपण तिला गोल गोल फिरवतो.
तिच्या सोबतचा प्रत्येक क्षण महत्वाचा वाटतो.
काहीतरी नविन तिच्याकडुन शिकत हे जातो.
तुम्हाला वाटले असेल मित्रहो ति माझी प्रियेसी होती.
नाही आहो ति तर माझी छत्री होती.

शेवटची भेट...........

शेवटची भेट...........
मला ती आज शेवटच भेटणार होती
दुख:शी भेट माझी आज तिथेच घडणार होती
आजचा दिवस सहज सरत होता
"अरे जरा दमानं" सांगितल तरी ऐकत नव्हता
तिला आज भेटुच नये असे वाटत होतं
मन माझं तिच्या निरोपाच्या
भयाने आतल्याआत तुटत होतं
पण पुन्हा तिचं ते मोहक रुप,
ते गहिरे डोळे मला दिसणार नव्हते
एकदाच शेवटच म्हणत
आज मन तिच्यासाथी हरणार होतं
कधी नव्हे ते आज पोहोचलो मी वेळेवर
नेहमी जिथे बसायचो बसलो
हात टेकवत त्या बाकावर
आज बागेतली गुलाबी फ़ुलं
मला काळी कुळकुळीत दिसत होती
पाखरांचे ते किलबीलणे मला विरह गाणी वाटत होती
अचानक बागेतलं वातावरण शांत झालं
"ही वादळापुर्वीची शांतत रे"!!
जणु मला इशा-याने सांगितल
हळु हळु काळे ढग जमु लागले
माझा हा विरह सोहळा पाहण्यास जणु ते आतुर झाले
तेवढ्यात ती आल्याची चाहुल लागली
तिने मला पाहताच लगबगीने पावलं टाकली
ती जवळ जवळ येत होती आणि पाऊशी सुरु झाला
सोबत त्याच्या विजाही कडाडु लागल्या
"आज तिच्या नजरेला नजर देउनच बोलणार"
मनात मी शपथ घेतली
पण ती समोर येताच माझ्याच
नजरेने माघार घेतली, नजर माझी भेदरली
ती शांत उभी होती
"उशीर का केलास"? मी विचारले
"अरे काम होतं जरासं!!" ती उत्तरली
बरं ठिक आहे म्हणत!! मी मान वळवली
का रे काय झाले ? तिने विचिरले
कुठे काय !! काही नाही ?
म्हणत मी तिच्या त्या प्रश्नाला टाळलं
"अछ्चा माझं लग्न ठरलय तो युएसए ला आहे"! तिने हसत सांगितल
माझं काय? मी झुरत विचारलं
अरे सॉरी घरातले तयार नव्ह्ते
मी तरी काय करु ?? सगळं गणितच चुकले
चल मी निघते म्हणत ती उठु लागली
पाठी न बघताच ती पुढे चालु लागली
नजर माझी तिच्या पाठमो-या
आकृतीकडे फ़क्त पाहत राहीली
हळु ह्ळु तिची ती आकॄती
माझ्या डोळयात फ़क्त भीजत राहीली
सोबत पावसाची सरही वाढु लागली
त्या पावसाच्या पाण्यात माझ्या
स्वप्नांची कागदी नाव बुडु लागली

का मी तिच्यावर जीव लावुन बसलो?????

का मी तिच्यावर जीव लावुन बसलो?????
प्रेमात फ़क्त असंख्य वेदनाच मिळतात
हे माहीत असुन नादानपणा करुन मी बसलो
का मी तिच्यावर जीव लावुन बसलो???
कदाचीत वेडा झालेलो मी
एका अनोळख्यासाठी मी
जवळच्यांना गमावुन बसलो
तिने दाखवलेलं प्रत्येक स्वप्न एक भास होतं
ती सगळी स्वप्ने मी खरी समजलो
का मी तिच्यावर जीव लावुन बसलो???
आधी प्रत्येक क्षण
माझ्या आयुष्याचा आनंदाच्या दिव्याने उजळलेला होता
का मी स्वत:च्या आसवांनी हा पेटता दिवा विझवुन बसलो
का मी तिच्यावर जीव लावुन बसलो????

----तु माग-----------

----तु माग-------

तु गाडी माग
मी ती देईन
तु बंगला माग
मी तोही देईन
तु प्लेन तेवढे मागू नकोस,
--इतकं नाही हायर करु शकत
तु चन्द्र माग
मी तो देईन
तु सुर्य माग
मी तोही देईन
तु वहाता वारा मात्र मागू नकोस,
- तो चित्रात नाही दाखवता येणार..
तु 'दिवाना' माग
मी ती देईन
तु आशिकी माग
मी तीही देईन
तु 'आवारापन' मात्र मागू नकोस,
-त्या सीडि मध्ये इमरान हास-मी आहे.
तु हृदय माग
मी ते देईन
तु मन माग
मी तेही देईन
तु 'धन' मात्र मागू नकोस,
--त्या शिवाय सर्व काही आहे
(बसं की आता---कीती खर्च करायला लावशील...........)

तो फ़क्त एक क्षण

तो फ़क्त एक क्षण
तो फ़क्त एक क्षण भान हरवून गेला
हरलो पण तो मला जिंकवून गेला
पावसाचं काय, तो नेहमीच येतो
प्रेमाचा एकच थेंब चिंब भिजवून गेला
चांदण्यातही आता मला तीच दिसते
जणू तो चंद्र मला फ़सवून गेला
देवळातही दुसरं काही मागवेना
नास्तिकाला तो श्रद्धाळू बनवून गेला
मी फ़क्त एक साधा चित्रकार होतो
अद्रुश्य रंगात मला तो रंगवून गेला
शब्द सुद्धा अपुरे पडू लागले
मनाला घातलेला बांध तो उसवून गेला..

तू

तू
तुझ्यावर खूप दिवसापासून लिहायचे म्हणतो
पण तुझ्या साठी शब्द सापडत नाही
तुझा विषय निघाला की शब्द हरवतात
कारण तेव्हा मी , मी नसतो , आस्म्नतात तुला शोधत भरकटत असतो.
पण नेहमीप्रमाणे निराशा होते
हातातली सिगरेट पुन्हा भाणावर आणते
तू नसूनही कायम बरोबर असते
सुख दु:खाच्या हर एक क्षणी खांद्याला खांदा लावून असते
आनंदाच्या वेळी तुझा बेभानपणा भासतो
निराश मनाची समजूत काढणारी तूच असते
तुज़ी प्रतिमा मी रोज रंगवत असतो
तुझ्याशी मी बोलतही असतो
थट्टा , मस्करी आणि भांडनही होते
तरी तू कोण आहेस? कुठे आहेस? काही आहेस?
एक ना अनेक प्रश्न अजूनही अनूत्तरीत आहेस
पण एक दिवस तू समोर येणार आणि
तेव्हा मात्र शब्दांचा पाउस मुसळधार बरसनार.....

उरली आता फ़क्त..........................

उरली आता फ़क्त..........................
तुझ्या निरोपाला आता खुप वर्ष सरली
तरी वाटे जणू ती गोष्ट कालच घडलेली
थांबलेलो होतो मी तिथेच पण तु पुढे निघालेली
उरली होती तेव्हा फ़क्त स्वप्न मनी लपवलेली
मनाला माझ्या तेव्हा मी खुप समजवले
त्या वेड्या ते कधीच न ऐकले
शेवटी आणलचं त्याने डोळयात पाणी
उरली आता फ़क्त या गाली आसवं, ओघळलेली
भले मिलतील तुला हजार साथी
बदलतीलही उद्या आपल्यातली नाती
उजळतील तुझ्या घरी सुखाच्या पुष्कळ वाती
पण, ठणकेल केव्हा ना केव्हातरी जखम सुकलेली
उरली आता फ़क्त ती जखम काळजातली
स्वप्नही तीच आणि त्याच पुन्हा आठवणी
आशेने पाहत राहीली स्वप्ने वेडी ठरलेली
वेढलंय जणू मला आता असंख्य वेदनांनी
उरली आता फ़क्त रात्र दुखां:नी सजलेली

कारण प्रेम करणं सोपं नसतं ...

कारण प्रेम करणं सोपं नसतं ...
प्रेम करणं सोपं नसतं...
सर्व करतात, म्हणून करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं...
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
शाळा कॉलेजांत असच घडतं...
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं...
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं...
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं...
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं...
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं...
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं...
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं...
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं...
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं...
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं...
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं...
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं

तो मीच असेल....................

तो मीच असेल....................
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल
माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल
कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

तुच जिंकावीस म्हनुन स्वत:लाच हरवत होतो मी.........

तुच जिंकावीस म्हनुन स्वत:लाच हरवत होतो मी.........
तुच जिंकावीस म्हनुन स्वत:लाच हरवत होतो मी.........
तुझ्या श्वासात राहत होतो मी
तुझ्या आठवणीत जगत होतो मी
रोज रात्री स्वप्नात माझ्या
फ़क्त तुलाच पाहत होतो मी
त्या सरसरत्या पावसात
त्या ओल्याचींब दिवसात
चोरुन चोरुन भिजत भिजत
फ़क्त तुलाच न्याहाळात होतो मी
कित्येक मित्र जवळ असुन
कुठेतरी एकटाच बसुन
फोटो तुझा समोर ठेवुन
अलगदपणे तुलाच कुरवाळीत होतो मी
स्व:ताला तुझ्या प्रेमात पाडतांना
रात्री तुला स्वप्नात बघतांना
भरदिवसा तुझे भास होतांना
तुला प्रेमात पाडायलाच विसरत होतो मी
तुझ्या विरहात एकटाच जगुन
भावना माझ्या मनातच दाबुन
आयुष्यात नेहमी तुच जिंकावीस म्हनुन
कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी
कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी............

अरे म्हणुन काय झालं..............

अरे म्हणुन काय झालं..............
बघा आज पुन्हा ते नव्या जोमाने वाहु लागलयं
सनई -चौघडे आज वाजणार
मांडवात आज वर-वधु नटणार
मन माझं मात्र रडंतय
अरे म्हणुन काय झालं
बघा आज नवं स्वप्नं सजु लागलयं
अनोळखी दोन मनं आज जुळणार
बागेत आज दोन नवी फ़ुलं उमलणार
मन माझं मात्र कोमेजलय
अरे म्हणुन काय झालं
फ़ुल होण्याचं स्वप्न त्यानेही कधीतरी पाहीलयं
मला लढायचे नव्हते तरीही मन लढलं
लढता लढता ते हरणार हे मी जाणलेलं
आणि शेवटी काल ते हरलं
अरे म्हणुन काय झालं
बघा आज ते खुश आहे कारण त्याने लढुन पाहीलय
ती गेल्यानंतर मन माझं भरपुर रडलं
नंतरचे त्याने सगळ्या दिवसांना रडतंच काढलं
आसवांच वारं काल थोडं थांबलेलं
अरे म्हणुन काय झालं
बघा आज पुन्हा ते नव्या जोमाने वाहु लागलयं

अशी एक संध्याकाळ असावी

अशी एक संध्याकाळ असावी
अशी एक संध्याकाळ असावी
सोबत फ़क्त तुच असावी
मावळत्या सुर्याने दिलेली सोनेरी किनार
त्या येणा-या रातीला असावी
अशी एक संध्याकाळ असावी
न सोडवता येणारी एक मिठी असावी
वर्तमानाच भान ठेऊन
भविष्याची स्वप्ने संगे असावी
अशी एक संध्याकाळ असावी
हातात तुझा हात घेताच जगाची भुल पडावी
दुराव्याने डोळे ओलावलेच जरी
त्याला सुखाची मात्र नक्की साथ असावी
अशी एक संध्याकळ असावी
प्रत्येकाला हवीहवीशी वाटावी
सहजा सहजी मिळत नसली तरी
प्रत्येकाच्या नशीबात असावी
खरच अशी एकतरी संध्याकाळ असावी
जिच्यासाठी सारी दुनियाही गहाण पडावी

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?
पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले
फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…
माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार
फ़क्त एकच प्रश्न करतो,
खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…

** एक ’ भेट ’ काय टळली.. **

** एक ’ भेट ’ काय टळली.. **

पहायचे होते मला..
तुझ्या डोळ्यांत , माझे प्रतिबिंब..
पहायचे राहून गेले..
ऐकायचे होते मला..
तुझ्या आवाजात , माझे नाव..
ऐकायचे राहून गेले..
अनुभवायचे होते मला..
तुझ्या श्वासांत , माझे श्वास..
अनुभवायचे राहून गेले..
तुला पाहणे, तुला ऐकणे, तुला अनुभवणे....राहून गेले....
भेटीचे तर होते................फक्त बहाणे ,
मजसाठी तर झाले असते ते , ’ जगणे ’..
तुझ्या डोळ्यांच्या तेजात ,
उजळले असते लक्ष दीप , माझ्या नेत्रांत
जे तेवत राहिले असते , उदास अंधा-या रस्त्यांत..
तुझ्या श्वासांच्या सुगंधात ,
फुलले असते संजीवन प्राण , माझ्या श्वासांत
जे भरत राहिले असते जीवन , श्वास रोखणा-या क्षणांत..
तुझ्या आवाजाच्या मारव्यात ,
गुंजले असते मधुर गीत , माझ्या आत्म्यात
जे देत राहिले असते साद , भग्न एकाकी आयुष्यात..
पण, पण....
एक ’ भेट ’ काय टळली..
अन ' जगायचे ' राहून गेले..
' तुझ्याबरोबर ' जगायचे राहून गेले..

** एक ’ भेट ’ काय टळली.. **

** एक ’ भेट ’ काय टळली.. **

पहायचे होते मला..
तुझ्या डोळ्यांत , माझे प्रतिबिंब..
पहायचे राहून गेले..
ऐकायचे होते मला..
तुझ्या आवाजात , माझे नाव..
ऐकायचे राहून गेले..
अनुभवायचे होते मला..
तुझ्या श्वासांत , माझे श्वास..
अनुभवायचे राहून गेले..
तुला पाहणे, तुला ऐकणे, तुला अनुभवणे....राहून गेले....
भेटीचे तर होते................फक्त बहाणे ,
मजसाठी तर झाले असते ते , ’ जगणे ’..
तुझ्या डोळ्यांच्या तेजात ,
उजळले असते लक्ष दीप , माझ्या नेत्रांत
जे तेवत राहिले असते , उदास अंधा-या रस्त्यांत..
तुझ्या श्वासांच्या सुगंधात ,
फुलले असते संजीवन प्राण , माझ्या श्वासांत
जे भरत राहिले असते जीवन , श्वास रोखणा-या क्षणांत..
तुझ्या आवाजाच्या मारव्यात ,
गुंजले असते मधुर गीत , माझ्या आत्म्यात
जे देत राहिले असते साद , भग्न एकाकी आयुष्यात..
पण, पण....
एक ’ भेट ’ काय टळली..
अन ' जगायचे ' राहून गेले..
' तुझ्याबरोबर ' जगायचे राहून गेले..

फक्त तुझ्याच साठी....

फक्त तुझ्याच साठी....
फक्त तुझ्याच साठी....
माझी भावना, फक्त तुझ्याच साठी....
माझी प्रेरणा, फक्त तुझ्याच साठी....
प्रतिक्षा, फक्त तुझीच....
माझी प्रतिभा,फक्त तुझ्याच साठी....
मी वेडा, फक्त तुझ्याच साठी....
मी शहाणा, फक्त तुझ्याच साठी....
मी रुसतो, फक्त तुझ्यावरच गं....
माझा हा बहाणा, फक्त तुझ्याच साठी....
माझं विश्व, फक्त तुझ्याच साठी....
माझं स्वत्व, फक्त तुझ्याच साठी....
माझं ह्रदय, कधीच तुझं झालंय....
माझं मनही आता, फक्त तुझ्याच साठी....
माझी निर्मळता, फक्त तुझ्याच साठी....
माझी रसिकता, फक्त तुझ्याच साठी....
माझं दैवत, तुच तर आहेस....
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, फक्त तुझ्याच साठी....
माझा श्वास, फक्त तुझ्याच साठी....
मी मरतो, फक्त तुझ्यावरच गं....
माझा हळवेपणा, फक्त तुझ्याच साठी....
माझे शब्द, फक्त तुझ्याच साठी....
माझा अर्थ, फक्त तुझ्याच साठी....
माझी कविता, फक्त तुझ्याच साठी....
नाही आवडली ?
फाडून टाकतो, फक्त तुझ्याच साठी....

च्यायला!!!! आज काळ पुन्हा सपशेल जिंकला!!!

च्यायला!!!! आज काळ पुन्हा सपशेल जिंकला!!!काळी मनी माझ्याकडे आली,थोडी थांबली अन रड रड रडली,मला म्हंटली बघ ना रे,त्याने मला आधीच रंग काळा दिला,कोणी मला जवळ घेत नाही,मी दिसले तरी पुढे कोणी चालत नाही,तुच सांग ना मी काय एवढी वाईट आहे,अगदीच त्या स्वार्थी माणसांसारखी नाही ना......अरे हेच काय कमी दुःख होते,त्याने माझे डोळे रंगीत केले,काळोखात दुध चोरायला जायची पण चोरी का?कधी गेलीच तर लांबुनच कळते,भित्र्या त्या माणसाला पाहुन मग पळते,तुच सांग ना मी काय एवढी वाईट आहे,अगदीच त्या पळकुट्या माणसांसारखी नाही ना.....तेवढ्यातच काळाची स्वारी आली,तो मनीकडे पाहुन म्हणाला,मला कळले आजही त्याने मला हुलविले,म्हणे, ये मने विसरलीस का ग,काल काळोखात जेव्हा घार आली होती,तेव्हा तुच तर पिलाला वाचवलंस,त्याला तोंडात घेउन दुर पळालीस....मग जरा आठव,तु तुझ्या काळ्या पिलाला कसं ओळखलंस????हे आठवुन,मनी बिचारी स्तब्ध वाटेने निघुन गेली.....मी मनात म्हंटले,च्यायला!!!! आज काळ पुन्हा सपशेल जिंकला!!!मग मी काळाला हुलकावणी देउन काळोखात निसटलो......

चल दोघे मिळून

चल दोघे मिळून
पावसात बागडू..
गार वारा , अंगावर शहारा
वेचून गारा
पावसांत खाऊ..
जलाचे तळे , फुलांचे मळे
निळाई कोसळे
बघत नाचू..
मोराची साद , चातकाची हाक
वीजांचा धाक
ऐकत राहू..
चिंब पक्षी , थेंबांची नक्षी
धुसर चांदणी
मोजत जाऊ..
सुगंधी माती , ओली तॄणपाती
हरित आठवणी
उरी ठेऊ..
नेत्री साचलेले , उरी दाटलेले
ओठ मिटलेले
थोडे उघडू..
नभी दामिनी , उरी ठिणगी
हवीशी मिठी
आता आवरु..
पुरे हे भिजणे..पुरे हे नाचणे..
ओंजळभर पाऊस मनी साठवू
अन येत्या ग्रीष्माला सामोरे जाऊ..

फसलेली प्रेमकहाणी

फसलेली प्रेमकहाणी
फसलेली प्रेमकहाणी!!
नाही वाटले कधीही
कुणा दुसऱ्यावरती झुरावे
तुझ्या नकाराने का माझे
जन्मांचे प्रेम सरावे?
नसते काही कळ्यांच्या
नशिबी भाग्य फ़ुलाचे
म्हणूनी का वेड्या कळ्यांनी
जन्म घेण्याचे थांबावे?
खचलो जरी मी आज
राहेन उभा नव्याने
उरी जपुन ठेवीन मात्र
माझे हे अर्धवट गाणे
जाशिल तू जिथेही
तव पायी सुख नांदावे
‌इतकाही स्वार्थी नव्हतो कधी मी
की तव शुभहीतही न चिंतावे!!
जा‌ईन देवाकडे जेव्हा मात्र
मांडेन माझे गाऱ्हाणे
विचारेन, इतके का शुल्लक होते
माझे हे प्रेम दीवाणे?

Saturday, September 6, 2008

जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती...!!!

जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती...!!!
अश्रूंचे झाले असते मोती,
काट्यान्ची झाली असती फुले,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या हृदयाची राणी झाली असती...
सुरानाही मीळाले असते नवे संगीत,
तीच्या नी माझ्या हृदयाची तार छेडली असती,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या स्वरांची रागीणी झाली असती...
डोळ्यांतून हृदयात उतरली असती प्रेमाची नशा,
जगन्यालाही मीळाली असती एक नवी दीशा,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या स्वप्नातली परी झाली असती...
प्रेमाची केली असती नवी काव्ये,
आकाशाचा कागद नी सागराची शाई केली असती,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या आयुष्याची कादंबरी झाली असती...
नको होते मग काहीही मला आयुष्याकडून,
जर तू माझी झाली असती...
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती.....!!!

नाती असतात किती विचित्र आणि मजेशीर !!!

नाती असतात किती विचित्र आणि मजेशीर !!!
नाती असतात किती विचित्र आणि मजेशीर !!!
काही अगदी जवळची,
तर काही अशीच वरवरची...
नाती काही क्षणातच जुळणारी,
तर काही अनेक वर्षातही न जाणवणारी...
काही नात्यांना देता येत नाही नाव,
तरीही ती असतात खूपच खास !
काही नाती ह्रुदयात घर करून रहणारी,
दूर राहूनही कधीच न तुटणारी...
मात्र काही नाती तुटल्यानंतरही,
जन्मभर आठवत राहणारी ........

न्यायाच्या न्याय मंदिरात

न्यायाच्या न्याय मंदिरातवकील, वकीलीचाच गळा आवळतातशब्दांचा मांडुन बाजारशब्दांनाच वेदना पोहचवतातवेदनेने व्याकुळलेले हे शब्दआपल्या अस्थीत्वाची भीख मागतातवकील मात्र कसाईसारखे त्यांनाभर कोर्टात कचाकचा कापतातकोर्टात शब्दाचा करुन वापरवकील शब्दालाच हरवतातख-या शब्दाला देऊन शिक्षाशेवटी फ़ासावर लटकवतातशब्दाच्या या महायुद्धातगीतेला सुद्धा बदनाम करतातघेऊन खोट्या शपथा मगदेवाला सुद्धा लाजवतातखोटे शब्द ख-या शब्दाचीसर्रास लचके मोडतातख-या शब्दाच्या तव्यावर मगखोट्या शब्दची पोळी भाजतात.शब्दाची महती जाननारेआता सर्व ईतिहासात जमा झालेतुम्हा आम्हा सर्वासाठी एक प्रेरना देऊन गेलेव्यापारी या दुणियेत शब्दांना जागा नसतेयेथे शब्दाचे महत्वही फ़क्त पैशापुरतेच असते

ती

तीसुटल्या सुटल्या गुंत्यात,ती एक गाठ होती..मिटल्या मिटल्या पापण्यांत,ती एक स्वप्नपहाट होती..थांबल्या थांबल्या सुखात,ती एक दुःखलाट होती..वेंधळ्या वेंधळ्या नभात,ती तुटकी चंद्रकोर होती..अंधार्‍या अंधार्‍या काळोखात,ती शहाणी रात्र होती..सुकल्या सुकल्या घावात,ती एक ओली जख्म होती..संपल्या संपल्या क्षणांत,ती एक नवी सुरुवात होती..तुटक्या तुटक्या शब्दांत,ती एक आर्त साद होती..एकट्या एकट्या जगात,ती एक नवी जीवनवाट होती..शहाण्या शहाण्या मित्रांत,ती एक वेडी मैत्रीण होती...

संकोच

संकोच
मनात संकोच येतोय एकच,
उत्तर तुझे काय असेल...?
अथांग प्रेम नयनी तुझ्या पण,
अर्थ त्याचा काय असेल...?
प्रेमाची अनेक नाती आहेत,
गोंधळ होतोय इथेच सारा, मनात तुझ्या कोणते असेल...?
ओठावरती स्मीत तुझ्या,
गुपीत त्याचे काय असेल...?
वाटल बघाव तुला एकदा विचारूण,
भाव तुझ्या मनाचा काय असेल...?
असच बोलतेस माझ्याशी की,
तुझ्याही मनात प्रेम असेल...?
हृदयात प्रेम वसलेले पण,
अंत याचा काय असेल...?
पण...
पुन्हा...मनात संकोच येतोय एकच,
उत्तर तुझे काय असेल...?
अथांग प्रेम नयनी तुझ्या पण,
अर्थ त्याचा काय असेल...?

प्रेमात तर दोघेही आहोत,

प्रेमात तर दोघेही आहोत,
पण इशारा कोण देणार..?
बोलायचे तर दोघंानाही आहे,
पण शब्द कोण देणार..?
भेटायचे तर दोघंानाही आहे,
पण वेळ कोण देणार..?
प्रेम तर व्यक्त करायचय दोघंानाही,
पण पहल कोण घेणार..?
स्पर्श तर दोघंानाही हवा आहे,
पण हींमत कोण देणार..?
तोडायचेत पाश बंधनाचे,
पण साथ कोण देणार..?
सोबत तर हवी आहे जन्माची,
पण हात कोण देणार..?
प्रेमात तर दोघेही आहोत,
पण इशारा कोण देणार..?

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना
माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे,
तू आहेस माझी स्वप्न परी,
नाही भाळलो फक्त तुझ्या रुपावरी,
फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी,
मी मात्र तसाच राहील वार्यावरी,
येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी,
ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी,
फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी,
तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जतुनी,
माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे...!!!

आठवते आपली ती पहीली भेट

आठवते आपली ती पहीली भेटएकमेकांकडे बघण्यासही लाजलो होतोहळूहळू नजर एकमेकांकडे वळताचआपण जागेपणीच निजलो होतोआठवते आपली ती पहीली भेटतुझं ते पावलोपावली अडखळणंतेवढचं एक निमित्त पाहून तुजपाशीमाझं आधार देण्यासाठी वळणंआठवते आपली ती पहीली भेटपुन्हा भेटण्यासाठी किती आतूर झालेलोतेव्हा म्हणालीस तुझ्या जिवनातमी एक खास भेट म्हणून आलेलोआठवते आपली ती पहीली भेटमन कसं चंदना सारखं दरवळलं होतंस्वप्नांचे कोवळे दव झेलतमनात प्रेम कसं हिरवळलं होतंआजही ती पहीली भेटमाझं मन गच्च धरुन आहेजरी नसलो तुझ्या कपाळावर तरीतुझ्या अंतरी ऊरून आहे

शोध

शोध
हरवलो आहे कुठे तरी
स्वत:लाच शोधतोय मी
काय माहित पण आज
पहिल्यांदाच हरलोय मी
का आज अचानक हे मन
असे भरुन आले, कसे काय
असे हे गहिवरुन आले
कधी वाटले नव्हते तुझ्या
विरहाने हि वेळ येइल माझ्यावर
आणि स्वत:लाच रडू येइल
स्वत:च्या अवस्थेवर
पण समजू नकोस मी
आयुष्यभर रडेल
मी असा कायमचा खचेल
कारण आता मला उमगले आहे
हरवलो मी नव्हतो हरवला
तर तू होतास
अर्ध्यावरती मला सोडून तर
तुच गेला होतास
आज रडत नाही तर
तुझ्या नशिबाला हसतोय
कारण माझ्या पूढे जाण्याच्या
तुझा प्रयत्न फ़सतोय
तेव्हा तु हसलास पण
आज वेळ माझी आहे
नियतीच्या पूढे कोण
भारी आहे

माझ्या प्रत्येक हास्यावर तुझा फुलणारा चेहरा

माझ्या प्रत्येक हास्यावर तुझा फुलणारा चेहरामाझ्या प्रत्येक दुखात सहभागी होणाराकिती वेडी होते मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला भुलायचेतुझ्या प्रत्येक शब्दाला माझ्या चेहर्यावर हसु फुलायचेतुझ्या फक्त अस्तित्वाने हर्षवेडी व्हायचे मीतुझ्या सोबतीतील हरेक क्षण मनाच्या कप्प्यात ठेवायचे मीवाटायचे मजला प्रेम प्रेम ते हेच का आहेतुझी माझी काया वेगळी पण ह्रुदय एकच आहेनादान मी निघाले तुझ्या पावलावर पाऊल टाकुन तुझ्यासाठी सगळी नातीगोती गेले विसरुनमायाळु आईचा पदर सोडला आधारव्रूक्ष वडीलांचा परका झाला एकटीला सोडुन गेलास काहीच का वाटले नाही तुला?आयुष्याच्या या बिकट वळणावर सोसाट्याच्या वार्याला घातला आहे मी आवरछत्र उडाले माझे पण धीर सोडला नाही अजुनतु गेलास पण सोबत माझा आत्मविश्वास आहे अजुन

एकांत तुला नि मला भेटवणारा,

एकांत तुला नि मला भेटवणारा,
भेटल्यावर हवाहवासा वाटणारा,
कधीकधी हसवणारा कधीकधी रडवणारा,
सुख दुखात नेहमी साथ देणारा,
मनातील भाव नकळतच जाणणारा,
वेदना विसरायला लावणारा ,
एकांत हा तुला नि मला आवडणारा.......
न बोलता सर्व काही सांगणारा,
न सांगता सर्व काही समजावणारा,
जिवनातील कमतरता दाखवणारा,
आठवणी अनाहुतपणे जागवणारा,
त्या आठवणींच्या हिंदोळ्यांवर खेळवणारा,
एकांत हा तुला नि मला आवडणारा.......
कधी प्रेम तर कधी द्वेष दाखवणारा,
कधी प्रेम तर कधी द्वेष दाखवणारा,
असाच हा एकांत तुला नी मला भावणारा,
अंधारलेल्या रात्री तारे मोजायला लावणारा,
रात्ररात्रभर तुझा विचार करायला लावणारा,
चंद्राच्या साक्षीने सर्व विसरायला लावणारा,
असाच हा एकांत स्वतःबद्दल काही सांगणारा,
एकांत हा तुला नि मला आवडणारा.......

रतन अबोलीची वेणी माळलेली

रतन अबोलीची वेणी माळलेली
आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात
संध्येसारखी बहरलेली तू
तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात
आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस
तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर
हा भुलावणा सप्तरंगी सोहळा
असा सर्वांगांनी फुलारलाच नसता.
आपल्याच नादात तू
पाठ फिरवून परत जाताना
तुझी पैंजणपावले जिवघेण्या लयीत
तशी पडत राहिली नसती
तर माझ्या आनंदविभोर शब्दांतून
कातरवेळची कातरता
आज अशी झिणझिणीत राहिलीच नसती.

अबोलकेपणाच्या गूढ गाढाइने
जाईजुईच्या सान्द्र-मन्द्र सुगन्धाचा लळा
सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास
तर उमलत्या फुलपाखरांची
आणि मुक्याभाबड्या जनावरांची
आर्जवी हळूवार भाषा
इतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती.
तू कशामुळे माझी जिवलग झालीस
ते खरेच मला आता आठवत नाही
पण मला तोडताना
समुद्रकाठच्या सुरुंच्या बनात
मिट्ट काळोखातून चन्द्रकोर उगवेपर्यन्त
तू मुसमुसत राहिलीस
हे मात्र मी अजून विसरू शकलेलो नाही.
त्या वेळची तुझी ती आसवे
अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत.
तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस
तर माझ्या श्रुंगाराचा अशोक
आज करुणेच्या आरक्त फ़ुलांनी
असा डवरलाच नसता.
तू तेव्हा आकाशा एवढी विशाल
आणि अवसेच्या गर्भासारखी दारूण
निराशा मला देउन गेली नसतीस
तर स्वत:च्याच जीवन-शोकांतिकेचा
मनमुराद रस चाखून
नि:स्संग अवधूतासारखा
मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात
असा हिंडत राहिलोच नसतो.
तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस
माझी सशरीर नियती होतीस.
तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे
तो झालोच नसतो.
तू दिसली नसतीस तर....

पेनाच्या टोकाशी एकदापेनाच्या टोकाशी एकदा

पेनाच्या टोकाशी एकदा
दु:ख निमूटपणे येऊन बसले
शाईच्या काळ्या रंगात
स्वत:ला पार विसरून गेले.

पेनाच्या टोकाने एकदा
एक दु:ख जन्माला घातले
गोंजारले, कुरवाळले, जपले
आता ते झाले अगदी आतले.

पेनाच्या टोकाला एकदा
दु:ख सहन झाले नाही
नुसतीच झरली शाई
गीत उमटले नाही.

पेनाच्या टोकाशी पुन्हा
दु:ख येऊन बसतेच
प्रत्येकच एकट्याची
अशी एक जागा असतेच...!

प्रेम इतकं अवघड का असतं

प्रेम इतकं अवघड का असतं

समजायला, उमजायला, व्यक्त करायला

असं नक्की काय असतं त्यात

की लागते ती इतकी आवडायला



चार-दोन मोकळ्या गप्पा, जूळते सूर

पूढची भेट कधी वाटणारी हूरहूर



नंतर मग नुसतं डोळ्यांनी बोलणं

या मनीचं त्या मनी, कोण्या जन्मीचं देणं



काही न घेता तिला देण्याची आस

बाकी काही नको, फ़क्त तू अशीच हास



निस्वार्थी, निरागस, निर्मळ असं प्रेम हवं

प्रेमात पडावं अणि फ़क्त ते अनुभवावं!

सर सर बरसली सर

सर सर बरसली सर
मनाला फुटले अंकुर

झेप घेतली आकाशाकडे
उघडली दशदिशांची कवाडे

रुजली मुळे खोलवर
जशी अस्तित्वाची मोहर

बहर आला- सुगंध पसरला
आनंदाने आसमंत व्यापला

फुलाचे मग फळ झाले
भू कुशीत अलगद निजले

सर सर बरसली सर
मनाला फुटले अंकुर

मुक्ता पाठक शर्मा

मला हरवून टाकलेस तू.....( Lost In Love )

मला हरवून टाकलेस तू.....( Lost In Love )
काय सखे तु जादू केलीस ,
मी माझ्यातच हरवून गेलो..
तुझ्या आसीम प्रेमाखातर..
माझं मलाच विसरून गेलो...
तुझे ते बंदिशातले केस
आज अचानक वार्‍यासवे डोलू लागले..
जणु माझ्या भुललेल्या चेहर्‍यावर,
पिसार्‍यातले सारे मोरपिस गुदगुल्या करू लागले..
माझे ते छुपे इशारे अन
तुझ्या त्या घाबरलेल्या नजरेचे तीर सारे..
माझ्या काळजाचा ठाव घेऊ लागले..
नकळत एवलूष्या जागेत तुझ्या प्रेमाचे बोन्साय वाढू लागले...
काय म्हणावा तुझा तो नखरा
जणू बारमाही ठरलेला दिवाळी अन दसरा...
मी आपलं स्वत:ला त्यात गुंतवत गेलो..
आनंदाचे दिस कायमचे बस आपलेसे करत गेलो..
तु नाही दिसायची डोळ्यासमोरी माझ्या
तेव्हा माझ्या पापण्याही जड व्हायच्या..
मान उंचावूनी मग त्या नयन बाहूल्या
चराचरात तुला,रातनदिस शोधत रहायच्या..
तुझ्यासोबत मी अनुभवला तो श्रावण मंद सरींचा
काय सांगू तुला मला कधी जाणवलच नाही
असाही असतो पाऊस लहरीचा अन
गोड गुलाबी मंद शिरशिरीचा..
कधी भांडलो तुझ्याशी उगाच,
अन कधी तरसवले मी तुला कारणांविनाच..
मग तुझी माफी मागताना साजने,
केला मी स्वत:ला एका पायवर उभा राहुनी अजब शिक्षेचा जाच
बघ कसा हरवलो सखे मी तुझ्यात
तुच सांग आता ही प्रेमाची कुठली जात..?
का झालोय मी प्रेमवेडा अन
सामावूनी गेलोय तुझ्या त्या अमर आत्म्यात...

आयुष्यात खूप माणसे येतात जातात.......

आयुष्यात खूप माणसे येतात जातात.......
काही माणसे असतात मेंदी सारखी....
कोरा असतो हात ... ती अलगदपणे हातावर उतरतात,
त्यांची नाजूक नक्षी आणि तो मेन्दिचा धुंद करणारा सुगंधही आपल्या जीवनात घेऊन येतात...
खूप हरवून जातो आपण त्यांच्या रंगात ....रंगून जातो.....
आणि मग हळू हळू...तो रंग, तो वास फिकट होत जातो
आणि त्या माणसांचे अस्तितवही दूर होते आपल्या जीवनातून..
पुन्हा परत तो कोरा हात आणि मनात त्या रंग, सुगंध, नक्षीदार आठवणी.....
तर काही माणसे असतात, त्या तळ्यात पडणा- या दगडासारखी,
शांत पाण्यात खळबळाट माजवणारी.....
ती पाण्यात पडताच तरंगवर तरंग येतात जीवनात.....
अनपेक्षित रित्या येणारी ही माणसे..... ढवळून काढतात जीवन..
मग कधी खालचा गाळही वर येतो......... गढूळाता वर येते आपल्या जीवनातली....
आपण सावरेपर्यंत तो गाळ जगासमोर येतो आणि ही माणसे गायब होतात...
त्या तळातच खोल कुठेतरी..........
तर कधी काही माणसे असतात म्रुगजळासारखी ...
त्यांच्या मागे आपण धावत असतो........ ओढीने....
पण ती तर म्रुगजळच ना...... न हाती येणारी...
तरीही त्या तहानलेल्या जिवाला दुसरे काही दिसतच नाही..........
ते धावत असते फक्त शेवटी हेच जाणण्यासाठी की .... हा एक भासच होता....
अशीही माणसे असतात हवेसारखी......... सगळीकडुन व्यापलेले असतो आपण त्यानी ....
पण आपल्याला जाणीवच नसते....
.आपला श्वासोच्छवास चाललेला असतो त्यांच्यावर .....
अगदी निस्वार्थी पणे ती असतात सतत जवळ......... पण दिसत नाहीत दृष्टीला.......
नसतील ती....... तर जगणार कसे आपण?...... तरीही आपण विसरलेले असतो त्यानाच..........
अशीही माणसे असतात.....ज्यांच्यावर आपण पाय रोवून उभे असतो...
जशी ही धरणी........ भुमी.....गुरूत्वाकर्षण म्हणतात याला ......
अशा माणसांनी घट्ट पकडून ठेवलेले असते आपल्याला...
न धडपडण्यासाठी... आणि न भरकटण्यासाठी ................
आधारस्तंभ........... न ढळणारा.... तो दुवा..... जो जीवनाला आकार देतो.....
बदल्यात कधी मागतो...कधी नाही ....पण सतत असतो..... जवळच कुठेतरी.........
माणसांच्या या व्याख्या अपुर्‍या आहेत...........
मी ही कदाचित या पैकी कुठल्यातरी व्याख्येत बसत असेन कोणासाठीतरी....

मैत्रीण . .

मैत्रीण . .
जग मी माझे हरलो मी तिला हरलो
मी माझे सर्वस्व हरलो मी मज स्वत:ला हरलो
पण तू मला भेटलीस माझी सखी बनून
मला आता असे वाटते की कोणी तरी आहे मजसाठी
मला तिची कमी दूर करणारे कोणीच भेटत नाही
पण तू मला भेटलीस अन माझी best friend ची कमी दूर झाली
अशीच मैत्रीण मी शोधत होतो जी मला समजू शकेल
अशीच मैत्रीण मी शोधत होतो जी तू आहेस
आयुष्यातील अनेक रंगातून प्रेमाचा रंग उडाला
आयुष्य माझे जणू रंगहीन झाले
पण माझ्या मैत्रीचा रंग अजून तसाच आहे
कारण त्यामध्ये तुझ्या मैत्रीचा रंग मिसळलेला आहे
मी माझ्या आयुष्याकडून कधीच कसली अपेक्षा केली नाही
मी कधीच कोणाकडून कसलीच अपेक्षा केली नाही
पण देवाने मला पहिल्यांदाच काही न मागता मला दिले
तूझ्यासारखी मैत्रीण त्याने मला दिली
माझी ह्या देवाकडे प्रार्थना आहे
तिची मैत्री मला कायम लाभावी
माझी मैत्री तिला कायम लाभावी
तूझी न माझी friendship अशीच अतूट राहावी

आज असा मला वर द्या.....

आज असा मला वर द्या.....
नाही माझ्याकडं सागरासारखं गहीरेपण
नाही माझं नदीसारखं निर्मळ दर्पण
या भवसागराचा तुमच्यासारखाच एक थेंब मी
आजन्म मला ईथ सुख-दुख:चा सौदागर होऊ द्या
प्रयत्न करुन मला यश-अपयशाच्या या सागरात पोहु द्या

ऊमलतोय लेखणीचा एक अनोखा गंध घेउन मी
नका लादु आत्ताच नियमांचा असा बंध तुम्ही
रोज नव्या रंगाची उधळण या रानात करायचीये मला
पण त्याआधी मला नीट तरी फ़ुलू द्या
शब्दसौंदर्याने नटलेल्या या जगात मलाही थोडं लिहु द्या

खुललेत आज माझ्यासाठी दार य़ा मोकळ्या नभाचे
फ़ुटलेत आजच पर मला नव्या दमाचे
नियमाच्या कात्रीने नका हो त्यांना असे कापु
एखाद्या नकोश्या फ़ांदीसारखा नका हो मला असे छाटू
व्हायचय या नीर तळ्याचा खळखळता आवाज मला
चढवायचाय या मनावर आत्मविश्वासाचा नवा साज मला
फ़क्त तुम्ही थोडा उत्साहाचा, विश्वासाचा स्वर मला द्या
"मिळो शिघ्र दर्शन मज विजयलक्ष्मीचे"
आज असा मला वर द्या.......आज असा मला वर द्या.....

प्रेमात कस असत.....

प्रेमात कस असत.....
आयुष्याच्या ह्या वाटेवरती
असच जगायाच असत
रडु कितीही आलं तरी
नेहमी हसायच असत....
ह्रुदयाच्या खेळात आपण
कधीच गुंतायच नसत
कारण बाहेर पडण त्यातुन
हे कधीच सोप नसत.....
थोडे दिवस थांबायचे,नंतर सोडायचे
हे तीच नेहमीचच असत
कारण आपल्या हळव्या मनापेक्षा
तीच लक्ष पैश्यातच असत....
दिवस रात्र क्षणोक्षणी
आपल मन तीच्यातच असत
मात्र आता समोर आलो तरी
तिच लक्ष आपल्याकडे नसत....
आता ती पहाणार नाही
कारण तिच्यासंगे कुणी दुसर असत
पण फक्त पैसासंपेपर्यंत आहे ती
हे त्या बिचाराल्याही माहीत नसत....
पण आता ती तुमच्याकडे पहातेय
तीच मन तुमच्यावर जडतयं
तुमच्यासाठीच जगते आहे ती
कारण तीला खर प्रेम कळतय....


ह्रुदयातल्याच वेदना खरया
बाकी सारे काही खोटे असतं
आता तीलाही कळले आहे
पैश्याने सारे काही होत नसत.....
आता ती फक्त तुमची आहे
बाकी सारे जग जळत असत
आता खरे सूखी आहात तुम्ही
जगाशी तुम्हाला काही घेण नसत....
म्हणुन सांगतो मिंत्रानो
प्रेम एकदा तरी करायच असत
प्रेमासारख्या सुंदर गोष्टीत
पैश्याला काही महत्व नसत....
एकदा दोनदा पडल्यावरही
पुन्हा पुन्हा उठायचे असत
कारण खरे असेल प्रेम आपले
तर ते आपल्यालच मिळणार असत....

देशिल कां साथ मला?

.........देशिल कां साथ मला?
०-०-०-०
देशील कां तू साथ मला, जीवनभर अशी?
ठेविन मी सुखात तुला, घेतो शपथ अशी...
जीवनरथाचे एक चाक मी होईन.
भार दुज्या चाकाचा मीच वाहीन.
ठेवशील कं हृदयात मला,जीवनभर अशी?
देशील कां तू साथ मला, जीवनभर अशी?
तुझ्या दुःखद क्षणांचा होईन भागिदार मी,
तव सर्व कामांत होईन हो मदतनीस मी,
लाभेल कां तुझी संगत मला,जीवनभर अशी?
देशील कां तू साथ मला, जीवनभर अशी?
तुझिया डोळ्यांतील प्रत्येक स्वप्न होईन मी,
तुझे स्वप्न सत्यात उतरवून दाखवीन मी ,
माझा जाणशिल कां तू मला,जीवनभर अशी?
देशील कां तू साथ मला, जीवनभर अशी?

आज काल माझे मलाच कळत नाहि,

आज काल माझे मलाच कळत नाहि,
मला हे काय होतय,
कदाचीत तुझ्या शिवाय जगणे,
मला असह्य झालय.
तू दिसली नाहिस कि,
मन कासाविस होत,
तुझ्या येण्याची ते वेड,
आस लाऊन बसत.
तु दिसलिस कि,
गालावर एकच खळि पडते,
ह्य हिरमूसल्या चेह-याला,
नवीन पालवि फ़ूटते.
तुझ्या जवळ येऊन,
खूप काहि बोलावेसे वाटते,
जवळ आल्यावर सर्व काहि,
ओठांवर येऊन थांबते.
एक दिवस सांगून टाकिन,
माझे तुझ्यावर प्रेम आहे,
ह्या मनाला हि वाटतय,
तुझाहि माझ्यावर जीव आहे.
तुझे उत्तर ऐकण्यासाठि,
मन फ़ार आतूर झालय,
क्षणभर सुद्धा थांबत नाहि,
इतके जोराने पळतय.
तुझ्या नकराचि मला,
खूप भिति वाटते,
तुझे गप्प राहणे ,
मनाला खूप टोचते.
नको गप्प राहूस अशी,
काहि तरि बोल,
तुझा एक एक शब्द,
माझ्यासाठि आहे अनमोल.
मला माहित आहे,
तुझ्या गप्प राहण्यात होकार आहे,
माझ्याहि या मनात,
फ़क्त तुझाच विचार आहे.
तु आणि मी मिळून,
एक नवीन सुरूवात करू,
आपल्या विचरांना एक,
नवीन दिशा देऊ॥॥

अस का होतं..........

अस का होतं..........
खरच हे अस का होतं
आपल्या जवळ येणार छानस फुलपाखरू
अचानक दूसर्या फुलाकडे जातं
खूप दूर् असताना पाहिलेल असत त्याला
वाटतं हे फक्त आणि फक्त आपणाकडेच यावं
छान दोन घिरट्या घेत ते माञ दुसर्याकडे जातं
ते आपल्या जवळ याव म्हणुन खुप सुगंध पसरवतो आपण
सुगंधाबरोबर् रंगाचीही उधळण करतो आपण
पण आपण सोडून दूसरच फूल मनात त्याच्या बसलेल असतं
खरच हे अस का होतं
आपल्या जवळ येणार छानस फुलपाखरू
अचानक दुसर्या फुलाकडे जातं
खूप वाट पहील्यानंतर् आपल मन कंटाळुन् जातं
त्या फुलपाखराचा वीचार न करण्याचा नीश्चय करतं
आणि त्याचवेळी हळुच ते आपल्या खांद्यावरती बसतं
खरच हे अस का होतं
आपल्या जवळ येणार छानस फुलपाखरू
अचानक आपल्याकडेच येत

वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात
वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥
"श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात"
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
"माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!"
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥
"जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत"
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥

विडंबन... फिटे अंधाराचे जाळे

विडंबन... फिटे अंधाराचे जाळे
विडंबन... फिटे अंधाराचे जाळे
पिती अंधारात सारे
झाले मोकळे हो ग्लास
नाकानाकातून वाहे
एक उग्र असा वास ॥धृ॥
बार जागे झाले सारे
बारबाला जाग्या झाल्या
सारे जमता हो एकत्र
बाटल्याही समोर आल्या
सारे रोजचे तरीही
नवा सुवास सुवास ॥१॥
दारु पिऊन नवेल्या
झाल्या बेवड्यांच्या जाती
बारमधेच साऱ्यांच्या
सरु लागल्या हो राती
क्षणापूर्वीचे पालटे
जग भकास भकास ॥२॥
जुना सकाळचा प्रकाश
झाला संध्येचा काळोख
दारुड्यांचा दारुड्यांना
दारुनेच अभिषेक
एक अनोखे हे मद्य
आले ग्लासात ग्लासात ॥३॥

कधी भुरभुर पाऊस झेललाय देहावर ?

hi this is all of u
कधी भुरभुर पाऊस झेललाय देहावर ?
इतक्या चोरपावलांनी येतो की
आलेला कळतच नाही ...
अगदी अंगाशी येईपर्यंत ...
पण तोपर्यंत मिटलेल्या डोळ्यांनी ...
ओलेत्या ओठांनी
पावती देऊन टाकलेली असते
सुखावल्याची ....
आणि तरीही
तो रिमझिमत राहतो ... साळसूदासारखाच
जोवर अनावर होत नाही
आपल्या भिजायच्या निर्णयामागची ओलीसुकी
................
................
चिंब ओल्या निर्णयाला उन्हं देताना कळतं
कधी कोसळ ..... कधी भुरभुर !
आपण आता सराईत झालो आहोत
ओलीसुकी करण्यात ....

** एक छोटीशी पणती खिडकीच्या कोप-यात.. **

** एक छोटीशी पणती खिडकीच्या कोप-यात.. **

एक छोटीशी पणती ,
खिडकीच्या कोप-यात..
खोलीचा कोपरा न कोपरा उजळवणारी..
जगाचा प्रकाश पाहून
दिपणारी..
स्वत:च्या ज्योतीची धग
जपणारी..
तमाच्या गमनाने
दुखावणारी..
प्रकाशाच्या आगमनाने
सुखावणारी..
पतंगांना जीवापाड
लुभावणारी..
पतंगांच्या वेडाला
स्वीकारणारी..
वा-याच्या फुंकरींनी
लाजणारी..
वादळात अस्तित्वासाठी
झगडणारी..
पणतीखालच्या तमाने
मंदावणारी..
वातीच्या टोकावरून सूर्य
शोधणारी..
तेल संपत आलय
जाणवणारी..
म्हणून अधिकच तेजाने
प्रकाशणारी..
ती छोटीशी पणती ,
खिडकीच्या कोप-यात..
मनाचा कोपरा न कोपरा उजळवत विझणारी..

Friday, September 5, 2008

* फक्त , ' तू अन मी ' जाणे.. **

* फक्त , ' तू अन मी ' जाणे.. **

गार वारे असे वाहले,
भाव का गारठले ?
कुणी न जाणे..
पण , शहारे का गारवा देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..
बहर वॄक्षांना मग फुलले,
पर्ण का गळाले ?
कुणी न जाणे..
पण , मनास का पालवी देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..
वैशाख वणवे तेव्हा पेटले,
ह्रदय का होरपळले ?
कुणी न जाणे..
पण , वणवे का ऊब देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..
नभी मेघ दाटून आले,
नयनांत का उतरले ?
कुणी न जाणे..
पण , पूर का तहान देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..
परत ,
वाहले वारे सुखाचे,
फुलले बहर प्रेमाचे,
पेटले वणवे विरहाचे,
दाटले मेघ दु:खाचे..
ॠतु जीवनी असे आले,
श्वासांत का मिसळले ?
कुणी न जाणे..
पण , ऋतु प्रेम शिकवून गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..
' तू अन मी ' जाणे..

बघ माझी आठवण येते का......

बघ माझी आठवण येते का......
सये....
आता तुझा प्रत्येक क्षण माझ्या अस्तित्वापासुन दुर असेल..
वर वर तु निच्छित असशील... मनात मात्र दुःखांचा पुर असेल !
काही दिवसांनंतर हा पुर ओसरेल...
कुठल्यातरी बेसावध क्षणी... पुन्हा पाऊल घसरेल..
पुन्हा कोणीतरी आवडू लागेल... पुन्हा डोळे झुरतील..
मनात मात्र तुझ्या तेव्हा...माझेच उसासे असतील..
वाट बघ... प्रेमाची भावना उफ़ाळून येते का..?
त्या क्षणी नकळत का होईना ... बघ माझी आठवण येते का?
किंवा कदाचित असंही होईल... तुला एखाद स्थळ सांगुन येईल..
दोन्ही घरची बोलनी होतिल... दोन्हीकडून होकार असेल..
घरात जरी 'हो' म्हटलस तरी... मनात तुझ्या 'नकार' असेल..
पुन्हा मन दुबळ होईल... स्वतःची बाजू मांडायला..
अपयशी ठरलं म्हणुन वेडं...तुझ्याशीच लागेल भांडायला..
भांडण मिटेपर्यंत कदाचित... अंगावरती हळद चढेल..
आपण नक्की काय करतोय? तुझ्या मनाला कोडं पडेल..
सनईच्या सुरावर, वाजत्रांच्या तालावर.. नव्या घरात प्रवेश होईल..
क्लेश होऊ देऊ नकोस..असेल त्याचा स्विकार कर..
तुझ्यावर आता जवाबदारी आहे.. याचाही तेव्हा विचार कर..
अंगावरची हळद आता बघ हळूह्ळू उतरते का?
पिवळ्या पाण्याकडे लक्ष गेल तर बघ.. माझी आठवण येते का?
दिवसामागून दिवस सरतील.. वर्षामागून वर्षे जातील..
नव्या आयुष्यामध्ये पुन्हा... नवी नाती निर्माण होतील..
नव्या नात्यांच्या नव्यापणात... आपले नाते जुणं होईल..
नात्याप्रमाणेच हळूहळू... मनसुद्धा सुनं होईल..
माझ्या सुन्या मनात मात्र... फ़क्त तुच उरशील..
माझ्यासारखीच.. एकदिवस तू सुद्धा झुरशील..
बघ.. एखादी पाऊलवाट तुला..माझ्या आठवणींकडे नेते काय?
बघ.. सुकल्या झाडाला पुन्हा.. नव्याने पालवी फ़ुटते काय?
आयुष्यात आतापर्यंत निदान... निखळ 'मैत्री' तरी उरते काय?
आणि आयुष्यात... एकदातरी .. बघ माझी आठवण येते का.....?

काय म्हणावं तुझ्या आठवणीला......

काय म्हणावं तुझ्या आठवणीला......
चुकवुन पाहवी नजर मी जेव्हा
स्वप्नांची रोज रात्रीच्या प्रहराला
नेमकं तेव्हाच जाग्या होती तुझ्या आठवणी
मनावर माझ्या खड्या पहा-याला
आता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला......
झाडुन काढावं म्हणतो मी जेव्हा
मनातल्या तुझ्या अस्ताव्यस्त प्रेमाच्या ओसरीला
पण, नेमका तेव्हाच उडतो तुझ्या
आठवणीचा बेशिस्त तो सुमार पाला-पाचोळा
आता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला......
जगुन पहावं म्हणतो मी जेव्हा
दुख:-वेदना अनुभवत प्रत्येक श्वासाला
पण नेमकं तेव्हा तुझ्या आठवणीचा श्वास
त्याआधीच कोंडतो काळजात माझ्या, स्वत:ला
आता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला......
रडुन काढावी रात्र म्हणतो मी जेव्हा
आठवुन तुझ्या शेवटच्या निरोपाला
अनं, नेमका तेव्हाच उगवतो सुर्य तुझ्या आठवणीचा
सारुन बाजुला त्या भयाण तिमिराला
खरंच गं , काय म्हणांव सांग मी
तुझ्या आठवणीला, तुझ्या आठवणीला....

मी तिच्यात नव्हतो

मी तिच्यात नव्हतो
मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती
मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती
तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती
तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती
तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.
नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.
तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती
तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती
आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.
मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती.

तू

तू
तू असा जरा मला न जाणणारा
सगळ काही समजून उमजुण
न समजण्याचा आव आणणारा
तू आहेस असा जरा थोडासा वेडा
माझ्या मनात सदोदित तुझ्या
ावखळ आठवणींचा सडा
तू आहेस असा जरा
तुटक तुटक वागणारा
मोठी स्वप्न पूर्ण करण्याच्या धडपडीत
माझ्या स्वप्नापासून दूर पळणारा
तू वाटलास तर हास मला
मी आहेच अशी प्रेम वेडी जरा
माझ्या कवितेतही वाहतो तुझ्याच
अव्यक्त प्रेमाचा झरा.....

:::::::::::आठवण:::::::::::

:::::::::::आठवण:::::::::::
आठवण येते कधी मला...
अन गालावर खुद्कन खळी पाडते...
तर कधी हसता-हसता....
डोळी माझ्या पाणी आणते.....
गर्दीत राहुन सुद्धा ती....
एकांताच आभास देते.....
अन एकांतात गेलो तरी मला....
नाही कधी एकटे सोडते....
डोळे बंद केल्यावरचे.....
नवे विश्व दाखवुन देते....
अन उघड्या डोळ्यांनाही .....
ती कधी धुंद करुन टाकते.....
दूर लोटायचा प्रयत्न केला....
तर अधिकच जवळ येवुन बसते....
जवळ तिला बोलवले तर मात्र....
कोपरयात कुठे दडुन बसते.....
हिच आहे माझी खरी मैत्रिण....
नेहमी साथ देणारी.....
आगंतुक असली तरी.....
हवी-हवीशी वाटणारी...

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न ...........

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न ...........
आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न ...........
वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं
आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं
म्हणाली, चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतो
चांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?
टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला
नेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला
आता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण
दुसऱ्या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराण
मग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालं
विचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलं
एक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?
Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?
शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी
प्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी
लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटली
हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली
प्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते
कारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,
ही अनंतकाळची तिच्या नवऱ्याची पत्नी असते

सहज बोलताना

सहज बोलताना
सहज बोलताना
तुझी बात आली
जुन्या सावल्यांची
जुनी रात आली
हसलो जरी मी
अश्रू फसवून गेले
तुझ्या आठवांची
बरसात झाली...
म्हटले कुणी,
"ती मौजेत आहे",
चला एकदाची
खबरबात आली...
खरे सांग माझे
कसे पाप झाले
का माझ्या स्मृतींना
अशी मौत आली?
लक्ष्मीचीच होती
तुझी पाऊले जी
कुणा पुण्यवंताच्या
दारात गेली...

प्रेमाचा अर्थ

प्रेमाचा अर्थ
ती म्हणाली होती प्रेम आहे माझे तुझ्यावर
नाही उमजला अर्थ तेव्हा तिच्या बोलण्याचा
माझ्याजवळं ती नाही, आता प्रत्येक आठवण सांधतो आहे
न कळलेल्या प्रेमाचा अर्थ बांधतो आहे
कदाचीत प्रेम म्हणजे आपुलकीच्या बोलांसाठी आतुर्लेले कान
पावसात शब्दांच्या चिंबं विसरतातं देह्भान
कदाचीत प्रेम म्हणजे भेटीच्या ओढीत झुरणारी ती
का फक्त एका कटाक्ष्यासाठी त्याने ओवळून टाकलेला जीव
कदाचीत प्रेम म्हणजे पाणीदार बोलके डोळे
शब्द नको तिला उसने, ती डोळ्यातूनच बोले
कदाचीत प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला तीचा विचार पहिला
आजही त्याने अर्धा घास तिच्यासाठी ठेवला
कदाचीत प्रेम म्हणजे पापण्यांमधे जपलेला सागर
ठेचं लागतच त्याला, तीला फुटलेला अश्रुंचा पाझर
कदाचीत प्रेम म्हणजे आठवणींचे धूके दाटलेले
ती निघून गेल्यावर अश्रूंच्या दवबिंदूसंगे मला वेढ
आता मात्र शब्धही लागतात अपुरे पडू
भावनांची गर्दी कशी कागदावर उतरवू ?
पण आता कळतयं....
प्रेम म्हणजे दूसर्यासाठी जगणे
आपले विसरून दुसर्याच्या विश्वात रमंणे
प्रेम म्हणजे दूसर्यासाठी जगणे...
प्रेम म्हणजे दूसर्यासाठी जगणे...

प्रेम करायला अजुन जमलेच नाही

प्रेम करायला अजुन जमलेच नाही
कीतीही सुदर मुलगी दीसली तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही
कोणाच्या मागे शीट्ट्यामारत फीरण
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही
कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही
दुसरयाचे वीचार ऎकत असतांना
आपले वीचार मांडण्याचि संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही
कधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाही
या व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही
प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाल कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही
फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दीसलेच नाही

मैत्रिण

मैत्रिण
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,
घर जवळ येताच पुढे निघून जावी.
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,
दिसलो की गालवर छान खळी पडावी.
कधी हसता हसताच ती रडावी,
कधी रडता रडताच खुद्कन हसावी.
हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही न बोलताच निघून जावी.
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी.
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.
सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.
थोडा वेळ मग ती शांत रहावी,
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.
ती बरोबर असली की आधार वाटावी,
अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!!

कधीतरी एकटे असावे असे वाटते...

कधीतरी एकटे असावे असे वाटते...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...
त्या वेळी आसपास कोणीही नसावे असे वाटते
आजुबाजुचे रान सारं गप्प गप्प झालेलं असतं
धुक्यानेही रानसारे गच्च गच्च झालेलं असतं
कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...
आले आले मी आले करत सर धावतं येते
तुझ्या आठवणींचे पिंपळपान मग मनात दाटुन येते
त्या आठवणींच्या जोरावर पुन्हा उंच उडावंस वाटंत
स्पर्श करुन तारयांना खाली खेचुन आणावंस वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...
त्या तिथे आज कुणीही येऊ नये असं वाटंत
अचानक कुठुन तरी आभाळ वर दाटतं
तलावाच्या काठी मग माझं मन भिजु लागतं
पाण्याच्या पार्श्वभुमीवर आपलं इंद्रधनुष्य शोधु लागतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...
पाऊस थांबल्यानंतर निसर्गाची रुपे निरखु लागतं
थव्यांसोबत पक्षांच्या मन मात्र उडु लागतं
गवताच्या पात्यांवर पडलेल्या थेंबाप्रमाणे दुःख सारं मग ओसरु लागतं
कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

शाळेची आठवण...

शाळेची आठवण...
आठवतात ते दिवस,
वर्गात जाण्यासाठि धावायचो,
पहिला बॆंच पकडण्यासाठि,
अनेकदा धडपडायचो.
आठवते मला दप्तरातली,
पेन्सिल आणि दुहेरी रेघांची वही,
घ्यायला लागायची ग्रुहपाठावर,
नियमित आई बाबांची सहि.
रोज सकाळि प्रार्थनेला,
वेळेवर हजर राहणे,
मधल्या सुट्टित डबा खाऊन,
धावत मैदानावर जाणे.
हस्तकलेच्या तासाला,
काहितरी उपद्व्याप करणे,
अन वर्गासमोर शिक्षकांचा,
पाठित धपाटा खाणे.
खेळाच्या तासाला जाताना,
एका रांगेतुन चालणे,
अन परत येत असताना,
मित्रांच्या खोड्या काढणे.
सहामाहि परिक्षेनंतर येणा-या
दिवाळिच्या सुट्टिची मजा
आणि त्या सुट्टित बाईंनी दिलेल्या
दिवाळिच्या अभ्यासाची सजा.
वार्षिक परिक्षेच्या वेळि,
येणा-या उन्हाळि सुट्टिची तयारी,
अन निकाल लागल्यानंतर,
बाहेर पडायची आमची हुशारी.
परत नवीन वर्गात जाण्यासाठि,
मनं उत्साहि व्हायचं,
अन पहिला बॆंच पकडण्यासाठि,
पुन: पुन: धडपडायचं......

तुच जिंकावीस म्हनुन स्वत:लाच हरवत होतो मी.........

तुच जिंकावीस म्हनुन स्वत:लाच हरवत होतो मी.........
तुच जिंकावीस म्हनुन स्वत:लाच हरवत होतो मी.........
तुझ्या श्वासात राहत होतो मी
तुझ्या आठवणीत जगत होतो मी
रोज रात्री स्वप्नात माझ्या
फ़क्त तुलाच पाहत होतो मी
त्या सरसरत्या पावसात
त्या ओल्याचींब दिवसात
चोरुन चोरुन भिजत भिजत
फ़क्त तुलाच न्याहाळात होतो मी
कित्येक मित्र जवळ असुन
कुठेतरी एकटाच बसुन
फोटो तुझा समोर ठेवुन
अलगदपणे तुलाच कुरवाळीत होतो मी
स्व:ताला तुझ्या प्रेमात पाडतांना
रात्री तुला स्वप्नात बघतांना
भरदिवसा तुझे भास होतांना
तुला प्रेमात पाडायलाच विसरत होतो मी
तुझ्या विरहात एकटाच जगुन
भावना माझ्या मनातच दाबुन
आयुष्यात नेहमी तुच जिंकावीस म्हनुन
कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी
कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी........

नाते प्रेमाचे

नाते प्रेमाचे
या जगात नाही दुसरे
प्रेमाहुन निर्मळ नाते...
पण हेच नाते क्षणात आपुले
जिवन विस्कटून जाते
या नात्याला व्याख्या नाही
थोर सांगून गेले बरे
मात्र ते फार सुंदर असते!
हे विधान आहे खरे.
केव्हातरी मी हि केले होते,
जिवापाड प्रेम एकावर.......
पण, माझ्या प्रेमाला त्याचा
नकार आहे आजवर.
मला दु:ख नाही त्याच्या
नकारार्थी उत्तराचे..
दु:ख वाटते ते त्याच्या
प्रेमाच्या व्याख्येतल्या वासना आणि
निव्वळ टाईमपास या शब्दांचे....
त्याला नाही कळला,
माझ्या एकतर्फी प्रेमाचा अर्थ...
त्याच्यासाठी वेचलेले प्रेमाचे अनमोल क्षण,
ते सारे गेले व्यर्थ.
मी त्याच्यावर आजही
मनापासून प्रेम करते,
मनातले प्रेमभाव,
कवितेच्या रुपात वाहते.
कळेल त्याला माझ्या
एकतर्फी प्रेमाची व्यथा जेव्हा!
फार वेळ झाली असेल...
कारण, मी असेन देवाघरी तेव्हा!

मैत्री कशी असावी?

मैत्री कशी असावी?
मैत्री कशी असावी?
जी कधीही पुसली न जावी
जशी रेघ काल्या दगडावरची
कोणतही वातावरण पेलवनारी
एखाद्या लवचिक वेलीसारखी......
कुठेही दडली तरी अस्तित्व दाखवणारी
कुठेही चमकणार्या हिर्यासारखी
थोड्याश्यावर न भागणारी
दुष्काळात तहाननेल्या मनसासारखी.......
पवित्रतेने परिपूर्ण अशी
देववरचि फ़ुले जशि.....
कधीही न सम्पणारी
विशाल सागरासारखी
सतत बरोबर असावी
शरीराच्या प्रत्येक अवयवासारखी....
तुटली तरि कायम आठवणीत असणार्या
आयुष्यातल्या सोनेरी क्षणासारखी...........
मैत्री अशी असावी
प्रत्येक तासाला, क्षणात बदलणारी
मनाला तजेला देणारी
कधीही न मरणारी
अमर झालेल्या जिवासारखी

तो रस्ता मला पाहून आज हसला

तो रस्ता मला पाहून आज हसला
तो रस्ता मला पाहून आज हसला
म्हणाला प्रेमात बिचारा फ़सला
हो ती हवा आजही तिथेच होती
नेहमी तुझे केस विसकटणारी
तो गाडयाचां गलकाही तिथे होता
रोज तुझ्या माझ्या वादंवर हसणारा
त्या वळणाने मला आवाज दिला खरा
पण आज मी मागे वळून पाहीलच नाही
रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या
आज कोणी माझ्याकडे पाहीलच नाही
आज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मला
आज सारखं चुकल्या सारखं वाटत होत
पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी
आज एक युदध हरल्या सारख वाटत होत
आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकच
रोज दोघं असतात पण आज हा एकच
उत्तर होत जरी एकटाच असलो तरी
तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला
पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज
असतेच ना सागराच्या भरती आहोटीला...

एक नवी प्रेम कविता... कशी वाटली नक्की लिहून पाठवा

एक नवी प्रेम कविता... कशी वाटली नक्की लिहून पाठवा
आज सकाळी तुला पाहूनी
मन माझे विरघळले आतुनी
ओघळले मोत्यासंम पाणी
तव ओलेत्या केसांमधुनि
नेत्रा मधले काजल सुद्धा
हळूच हसले सलज्जतेने
तुझ्या मनातील भावच त्याने
संगितले जणू आत्मीयतेने
थवा फुलांचा दारी आला
तुला भेटण्या आतुर झाला
घमघमणारा सुगंधही मग
फुलांसावे त्या फितूर झाला
अंबरही मग झुकले खाली
पाहून तुझी ही नेत्रपल्लवी
वटलेल्या खोडास अचानक
फुटली ग नाजूक पालवी
तुला पाहूनी रवि-किरणांनी
दिधली होती शीतल छाया
ते ही बिचारे पाघळले ग
पाहून तुझी ही नाजूक काया
तुला पाहूनी वाटत होते
या क्षणी तरी कुठे न जावे
तुझ्याच नेत्रा मध्ये हरवून
तुझ्याकडे ग पाहत रहावे
नकोच मज़ला दुसरे काही
सखे, तुझी ग साथ हवी
आयुष्याच्या वाटेवरती
तव प्रेमाची हाक हवी

खरच सांग सजणी देशील का मजला साथ.

खरच सांग सजणी देशील का मजला साथ.
माझ्यावरती प्रेम करताना करशील का दुनियेवरती मात.
कधीच आणू नकोस माझ्या जिवनात अंधेरी रात्.
सदा पेटती ठेव जिवनात माझ्या प्रेमाची वात.
प्रेमाच्या या वातेला कधिच विझवू नकोस.
प्रेमामध्ये कधिच माझ्या डोळ्यात अश्रू अणू नकोस.
प्रेमातिल वचने आठवणित ठेवशिल का.
असेल मनात दुख तरी सुखी मनाने राहशील का.
प्रेमातील या दुनियेतिल राणी तुच आहेस.
प्रेमाची माझ्या वात विझवणारी हवा हि तुच आहेस्.

एकदा तरी मला तुला

एकदा तरी मला तुला
एकदा तरी मला तुला,
एकदा तरी मला तुला,
मनापासुन हसवायचंय,
दोन क्षण का असेनात्या निखळ हास्यात,
स्वतःला हरवायचंय...
फक्त एकदाच मला तुझ्या डोळ्यांत,
नजरेला नजर मिळवत बघायचंय,
डोळ्यांमागचं वादळ मला,
अनाहुतपणे अनुभवायचंय...
फक्त एकदातरी मला,
तुला प्रेमाने जवळ घ्यायचंय,
नाहीस जगात ह्या तु एकटी,
हेच तुला समजवायचंय...
फक्त एकदा तरी तुला,
माझ्यासाठी बेचैन होताना पाहायचंय,
त्यासाठी मला तुझ्याशी,
एकदा खोटं खोटंच भांडायचय...
मग मला तुझ्यासाठी,
एकदाच विदुषक व्हायचंय,
तुझा तो लटका राग मला,
चुटकीसरशी पळवायचंय...
तुझा हात मात्र मला,
आयुष्यभरासाठीच पकडायचाय,
प्रेम करतो किती तुझ्यावर,
हेच तुला सांगायचय...

मी मात्र काहीच नाही

मी मात्र काहीच नाही
ते जग तिचे
ते सर्वस्व ही तिचेच
मी मात्र काहीच नाही
ते स्वप्न तिचे
ते पुर्णत्व ही तिचेच
मी मात्र काहीच नाही
ते मैत्र तिचे
ते जीवन हि तिचेच
मी मात्र काहीच नाही
ते सुख तिचे
ते दु:ख ही तिचेच
मी मात्र काहीच नाही
ते अनादिरूप तिचे
तो अंतर्नाद ही तिचाच
मी मात्र काहीच नाही
तो उत्फ़ुल्ल गुलाब तिचा
ति नाजुक सायली हि तिचीच
मी मात्र काहीच नाही
हे माझे जीवन, अन्तर्नाद
माझे सारे तिचे च ना !
मग सांगा , मी तिचीच ना

*** आठवणी तुझ्या... जणू पावसाच्या सरी ***

आठवणी तुझ्या... जणू पावसाच्या सरी,
धुंद होते त्या सरींमध्ये चिंब चिंब भिजुनी !
आठवणी तुझ्या... जणू इंद्रधनू सप्तरंगी,
प्रत्येक रंगात तुझ्या जाते मी रंगूनी !
आठवणी तुझ्या... जसा हा निसर्ग हिरवा,
हवाहवासा वाटतो तुझ्या प्रितीचा गारवा !
आठवणी तुझ्या... म्हणजे झुळझुळ वाहणारी नदी,
तुषार प्रितीचे तुझ्या झेलते मी अंगावरी !
आठवणी तुझ्या... म्हणजे काळे काळे ढग,
दाटून आले की... वाहू लागते अश्रूंची सर !!!!
*******************************************
आठवतात जेव्हा जेव्हा ते क्षण तुझ्या सहवासाचे ..
गालातल्या गालात एकटीच मी हसत राहते !
मनातल्या मनात काहीतरी गुणगुणत असते..
जणू तेच मोहक क्षण पुन्हा पुन्हा जगत असते !
आठवतात डोळे तुझे ... माझ्याकडे एकटक बघणारे,
एका क्षणातच माझ्यावर काहीतरी जादू करणारे !
आठवतात ओठ तुझे ... बंद असूनही खूप काही सांगणारे,
नकळत कधीतरी सूरांचे तराणे छेडणारे !
आठवतो स्पर्श तुझा हळूवार, अगदी आपुलकीचा..
मखमली अंगावर जसा पदर रेशमाचा !
वाटते, तू असावा.. नेहमी असाच माझ्या समीप,

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस

प्रेम केले तुझ्यावर मी,

प्रेम केले तुझ्यावर मी,
प्रेम केले तुझ्यावर मी,
पण ते खरे होते खोटे नाही,
समज असुन असमज वागलीस,

तुला काहीच कसे वाट्ले नाही........
तुझे असे वागणे देखील,
मला अद्याप काही कळाले नाही,
तु अशी वागलीस खरी,
पण तुला काहीच कसे वाट्ले नाही,
प्रेम या रसाला तु,
अम्रुत समजु शकली नाही,
एवढा पापी विचार करण्यापुर्वी,
तुला काहीच कसे वाट्ले नाही,
जीवनाच्या अखेर सुद्ढा मला प्रेम मीळाले नाही,
मी मेल्यावर लोक काय बोलतील याचे तुला काहीच कसे वाट्ले नाही,
तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस,
तू कशही असलीस तरी आजही माझी आहे,
फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही,
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस,
एक सत्य आहॆ मी तूझ्याशीवाय जगू शकत नाही,
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही,
मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी,
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही,
मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस,
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस,
मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं,
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस?????

आज असा मला वर द्या.....

आज असा मला वर द्या.....
नाही माझ्याकडं सागरासारखं गहीरेपण
नाही माझं नदीसारखं निर्मळ दर्पण
या भवसागराचा तुमच्यासारखाच एक थेंब मी
आजन्म मला ईथ सुख-दुख:चा सौदागर होऊ द्या
प्रयत्न करुन मला यश-अपयशाच्या या सागरात पोहु द्या

ऊमलतोय लेखणीचा एक अनोखा गंध घेउन मी
नका लादु आत्ताच नियमांचा असा बंध तुम्ही
रोज नव्या रंगाची उधळण या रानात करायचीये मला
पण त्याआधी मला नीट तरी फ़ुलू द्या
शब्दसौंदर्याने नटलेल्या या जगात मलाही थोडं लिहु द्या

खुललेत आज माझ्यासाठी दार य़ा मोकळ्या नभाचे
फ़ुटलेत आजच पर मला नव्या दमाचे
नियमाच्या कात्रीने नका हो त्यांना असे कापु
एखाद्या नकोश्या फ़ांदीसारखा नका हो मला असे छाटू
व्हायचय या नीर तळ्याचा खळखळता आवाज मला
चढवायचाय या मनावर आत्मविश्वासाचा नवा साज मला
फ़क्त तुम्ही थोडा उत्साहाचा, विश्वासाचा स्वर मला द्या
"मिळो शिघ्र दर्शन मज विजयलक्ष्मीचे"
आज असा मला वर द्या.......आज असा मला वर द्या....

मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढे

मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढेस्वप्नांच क्षितीज सोडून चाललो मी वादळाकडेवाटल तुझी सोबत असेल तर जिकेन जग सारंआज तुच पाठ फीरवलीस आता पाहू मी कोणाकडे.पसरल्या काळोखात मी उभा अर्धा चद्रांकडेता-याचं जग सोडून चाललो विझणा-या दिव्याकडेतु तर विझवुन गेलीस ज्योत माझ्या घरातलीआता उडेड मागु तर मागु कसा या प्रकाशाकडे.ओघळ्त्या आसवात मी उभा ओल्या किना-यापुढेउधाणलेल्या लाटाही हसतात पाहुन तुझ्या वेडयाकडेआठवतय आपल्याला पाण्यात भिजण्याच वेड होतंआज अश्रुंनीच भिजुन परतलोय मी पुन्हां घराकडे.तु म्हणतेस मागुन बघ मिळेल तुला प्रेम कोणाकडेकोण येइल घरात माझ्या काय आहे आता या शुन्याकडेइथेच शब्दांनाही थाबंवतोय मी आता काय करु कारणतुझ्या आठवणी पुन्हां आल्या आहेत माझ्या पापण्यांकडे.

माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नका

माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकामी तर मुखवट्यांचा राजा आहेकधी ऐकायला मधूर होतो, पणआज कर्कश वाजणारा बाजा आहेमाझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकाअंतरी दु:खांचा लावा आहेपेट घेतला नाही आजवरशेजारीच अश्रूंचा ओलावा आहेमाझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकामी तर वेदेनेची खाण आहेतुलना नाहिच भीष्म पिताम्याशीमी तर त्यांच्याहून महाण आहेमाझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकाझेलले मी कितीतरी घाव आहेगळा चिरला ज्यांनी त्यांना मित्र म्हणालोअलिप्त माझा असा स्वभाव आहेमाझ्या हसऱ्या चेहऱ्यावर जाऊ नकामाझं झिजणंही भकास आहेकधी प्राणवायू होतो ज्यांचाआज त्यांचाच कोंडलेला श्वास आहे

आवडेल मला"

आवडेल मला फ़ुलपाखरु बनायलारग माझे सगळे उधळायलानाजुकशा सगळ्या फ़ुलावर बसायलावारयाला सोबती बनवून बागडायलाआवडेल मला नदी बनायलातहान सगल्याची शमवायलाइद्रधनुषी छटा आकाशात उमटवायलामासळ्यासोबत मनसोक्त खेळायलाआवडेल मला दवबिन्दु बनायलापानावरुनी घसरकुन्डी खेळयलाटोकाला पानाच्या धरुन लटकायलानिसर्गाच्या प्रत्येक रुपाला बिलगयलाआवडेल मला माकड हे बनायलाकसरत फाद्यावरुन करायलाडोलीत झाडाच्या रहायलालाम्ब माझी शेपटी विचरायलाआवडेल मला दोर बनायलापतगाला आकाशात उडवायलाउडत्या पाखरासोबत बोलायलाकोणाचा तरी आधार व्हायला

ऊब्"

आठवणीन्नी तुझ्या डोळ्यात माझ्या पाणी दाटलेपरत कधी न सापडणारया वाटेवर चालावे वाटलेतुझ्या मायेच्या उबेखाली नव्हती काळजीच कसलीखरया अर्थाने तुझी उणीव आज मला भासलीतु नसता नतरची कल्पनाही मी कधी नव्हती केलीम्हनुणच आज छत नसलेल्या घरासारखी अवस्था झालीआपल्या घराच्या आधाराची भिस्त तर तुच होतीस म्हणूनच आमच्यात नसतानाही आमच्यात राहिलीस आज डोके ठेऊन रडायला कुस राहीली नाहीहळूवार फिरविलेल्या हाताची किमत कळली आईआज् तु असतीस तर सावरले असतेस मलाअसतीस तर सावरायची वेळ आलीच असती कशालातुला परत पाठवावे म्हणून केविलवाणी धडपड करित राहीलोहात जोडून आज मी देवाकडे प्रार्थना करीत होतो न होणारया गोष्टिचे स्वप्न पहात होतोबोट करुन चादण्यात आई शोधत होतो......................आई शोधत होतो

आपली मैत्री

आपली मैत्री
आयुष्याच्या वेलावर फुललेलं फुल
जसं एक खेळ्कर हसणारे मुल
हिवाळ्यातल्या सकाळचे टपोरे दवबिंदु
नाही त्यात किंतु परंतु
संध्याकाळी आकाशी रंगाची उधळण
भिरभिरत्या मनाला मैत्रीचे कुंपण
झरझर पावसाची आहे सर
झुळझुळणारा झर्याचा हा निर्झर
निष्पाप अशा या मैत्रीची चादर
सतत राहु दे माझ्या अंगावर
उबेत या जीवन सफल माझे
रक्ताचे नाही ह्रुदयाचे नाते तुझे माझे
साजरा करायला मैत्रीचा दिवस हवा कशाला
मैत्रीच साजरी करतो आपण प्रत्येक क्षणाला

कुणाच्या अतीव विरहानं व्याकूळ

कुणाच्या अतीव विरहानं व्याकूळ, वृथा आसवांच्या धारा लावायच्या नसतातसमुद्र किनारी हलक्या हातानं वाळूत हळूच रेघा मारुन मिटवायच्या नसतातडोंगर दरी त्याचं-तिचं नाव घेऊन आपणच त्याचे प्रतिध्वनी ऐकायचे नसतातज्यांच्या पावलांचे ठसेही कायमचे मिटलेले अशांचे पत्ते विचारायचे नसतातधुक्यात विरलेल्या वाटांकडे एकटकअपेक्षेने डोळे लावून बसायचे नसतातकुणितरी वळून आवाज देईल म्हणूनपाठीमागे कान लावून बसायचे नसतातज्या वळणावर भेटलात दोघंत्या वळणावर कायमची घरं बांधायची नसतातझाल्या जरी अनेकदा नेत्र-कडा ओल्याहलकेच कुणाला न समजता पुसायच्या असतातअनेक उघडी दारं सोडून कायमचीबंद झालेली दारं ऊगाच ठोठावायची नसतातहा मनोहर जन्म एकदाच त्याच्या - तिच्या आठवणींनी अवघी आयूष्य वेचायची नसतात

कॉलेजला जाताना

कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण..हत तिच्या मारी
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..
त्यादिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलाण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
"प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली."
एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.
"थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली
शेवटी मनाची तयारी केली
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली
गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली
पण..हत तिच्या मारी
म्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली

खर्‍या प्रेमाला....

खर्‍या प्रेमाला....
मुलायम चादर बनून रात्रभर तुझ्या सहवासात जगावं,
पहाटे कोंबड्याची बांक बनून तुझ्या कानावरती पडावं,
तुझं गोड गुलाबी स्वप्न बनून आळसातून बाहेर पडावं,
बस्स एवढचं.! खर्‍या प्रेमाला आणखी काय हवं.....
बांधलेल्या केसातून निसटलेला एक केस बनून गालावरती फिराव,
आंघोळीचं चंदन पाणी बनून तुझ्या अंगावरून ओघळाव,
भिजलेल्या केसातून अलगद टपकनारा एक सुगंधी थेंब व्हावं,
बस्स एवढचं..! खर्‍या प्रेमाला आणखी काय हवं.....
तू तयार होताना आरसा बनून तुला एकटक निरखावं,
तुझा सुगंध बनून फुला-पाकळ्यातुन आसमन्तात दर्वळाव,
तुज़ रूप बनून सर्वांच्या नयनातुन हृदयावर बरसावं,
बस्स एवढचं..! ख र्‍या प्रेमाला आणखी काय हवं....
तू मागवलेल्या सामोस्याची गरम गरम वाफ व्हावं,
नाष्टयातल्या ब्रेडला लावलेलं गोड जाम व्हावं,
चहातली साखर बनून तुझ्या जिभेवरती विरघळाव,
बस्स एवढचं..! खर्‍या प्रेमाला आणखी काय हवं...
टी व्ही पाहताना तू टॉम आणि मी जेरी व्हावं,
तुझं सुंदर अक्षर बनून कागदावरती उतराव,
तुझा सुरेल नाजूक आवाज बनून हवेत विरूंन जावं,
बस्स एवढचं..! ख र्‍या प्रेमाला आणखी काय हवं.....
सांजवेळी सागर किनारी एक लाट बनून तुझ्या पायांना स्पर्शावं,
उद्या उजाडायचं म्हणून तुझ्या साक्षीने पुन्हा बुडाव,
अन एखादी चारोळी बनून INBOXमधे येऊन SWEET DREAMS म्हणावं,
बस्स एवढचं..! खर्‍या प्रेमाला आणखी काय हवं..

चल दोघे मिळून

चल दोघे मिळून
पावसात बागडू..
गार वारा , अंगावर शहारा
वेचून गारा
पावसांत खाऊ..
जलाचे तळे , फुलांचे मळे
निळाई कोसळे
बघत नाचू..
मोराची साद , चातकाची हाक
वीजांचा धाक
ऐकत राहू..
चिंब पक्षी , थेंबांची नक्षी
धुसर चांदणी
मोजत जाऊ..
सुगंधी माती , ओली तॄणपाती
हरित आठवणी
उरी ठेऊ..
नेत्री साचलेले , उरी दाटलेले
ओठ मिटलेले
थोडे उघडू..
नभी दामिनी , उरी ठिणगी
हवीशी मिठी
आता आवरु..
पुरे हे भिजणे..पुरे हे नाचणे..
ओंजळभर पाऊस मनी साठवू
अन येत्या ग्रीष्माला सामोरे जाऊ..

फसलेली प्रेमकहाणी

फसलेली प्रेमकहाणी!!
नाही वाटले कधीही
कुणा दुसऱ्यावरती झुरावे
तुझ्या नकाराने का माझे
जन्मांचे प्रेम सरावे?
नसते काही कळ्यांच्या
नशिबी भाग्य फ़ुलाचे
म्हणूनी का वेड्या कळ्यांनी
जन्म घेण्याचे थांबावे?
खचलो जरी मी आज
राहेन उभा नव्याने
उरी जपुन ठेवीन मात्र
माझे हे अर्धवट गाणे
जाशिल तू जिथेही
तव पायी सुख नांदावे
‌इतकाही स्वार्थी नव्हतो कधी मी
की तव शुभहीतही न चिंतावे!!
जा‌ईन देवाकडे जेव्हा मात्र
मांडेन माझे गाऱ्हाणे
विचारेन, इतके का शुल्लक होते
माझे हे प्रेम दीवाणे?