Friday, September 5, 2008
कुणाच्या अतीव विरहानं व्याकूळ
कुणाच्या अतीव विरहानं व्याकूळ, वृथा आसवांच्या धारा लावायच्या नसतातसमुद्र किनारी हलक्या हातानं वाळूत हळूच रेघा मारुन मिटवायच्या नसतातडोंगर दरी त्याचं-तिचं नाव घेऊन आपणच त्याचे प्रतिध्वनी ऐकायचे नसतातज्यांच्या पावलांचे ठसेही कायमचे मिटलेले अशांचे पत्ते विचारायचे नसतातधुक्यात विरलेल्या वाटांकडे एकटकअपेक्षेने डोळे लावून बसायचे नसतातकुणितरी वळून आवाज देईल म्हणूनपाठीमागे कान लावून बसायचे नसतातज्या वळणावर भेटलात दोघंत्या वळणावर कायमची घरं बांधायची नसतातझाल्या जरी अनेकदा नेत्र-कडा ओल्याहलकेच कुणाला न समजता पुसायच्या असतातअनेक उघडी दारं सोडून कायमचीबंद झालेली दारं ऊगाच ठोठावायची नसतातहा मनोहर जन्म एकदाच त्याच्या - तिच्या आठवणींनी अवघी आयूष्य वेचायची नसतात
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment